आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कन्व्हेअर बेल्ट:कोल्हापुरात कन्व्हेअर बेल्टचा वापर करून 3 हजार गणेशमूर्तींचे विसर्जन

पुणे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानतळावर सरकत्या पट्ट्यांवरून येणारे सामान आपण अनुभवले आहे. त्याच तत्त्वाचा वापर करून कोल्हापूर महानगरपालिकेने पुण्यातील व्हिव्हीअन कन्व्हेअर्सच्या सहकार्याने गणेश विसर्जनासाठी उपयुक्त कन्व्हेअर बेल्टचा यशस्वी वापर सुरू केला आहे. या बेल्टच्या साह्याने एका तासात तब्बल तीन हजार मूर्तींचे विसर्जन यशस्वी झाले आहे, अशी माहिती कोल्हापूर मनपाचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शारंगधर देशमुख यांनी ‘दिव्य मराठी ‘ला दिली.

असे कार्य करतो कन्व्हेअर बेल्ट - पाण्याच्या साठ्याच्या मध्यभागापर्यत लांबी - एका कन्व्हेअर बेल्ट मधून आवश्यकतेनुसार दुसरा बेल्ट उघडण्याची सोय - १८० अंशात पाण्याच्या साठ्यात फिरू शकतो त्यामुळे पाण्याचा साठ्याच्या एकाच ठिकाणी मूर्तींचा ढीग होत नाही - ४ सेकंदात एक गणपती विसर्जित होतो - परिणामी एका तासात तब्बल ३ हजार मूर्तींचे विसर्जन यशस्वी - संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे ८३ लाख रुपये खर्च

पेटंट घेण्याची प्रक्रिया सुरू घरगुती मूर्तींचे विसर्जन यशस्वी झाल्यावर आता मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन देखिल अशा प्रकारे यशस्वी करता येईल, याची खात्री आहे. तसे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे पेटंट घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली आहे. तशी नोंदणीही झाली आहे, असे शहर अभियंता नेत्रदीप सरनौबत यांनी सांगितले.

मूर्तीचे पावित्र्य राखून विसर्जन केल्याचे भाविकांना समाधान : नाईक ^ वैभव नाईक म्हणाले, ‘आम्ही त्यांच्या आवश्यकता समजून घेतल्यावर टेलिस्कोपिक कन्व्हेअर बेल्ट ची निर्मिती केली. हा बेल्ट घरगुती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. यासाठी आम्हाला स्पॅनिश कंपनीचेही सहकार्य मिळाले. कन्व्हेअर बेल्ट पाण्याच्या साठ्याच्या खोलवर मूर्ती विसर्जित करतो. त्यामुळे भाविकांना मूर्तीचे पावित्र्य राखून विसर्जन केल्याचे समाधान लाभते.

दरवर्षी ७५ हजार मूर्तींचे विसर्जन ^कोल्हापूर मनपाचे शहर अभियंता नेत्रदीप सरनौबत म्हणाले, ‘कोल्हापूर मध्ये सुमारे ७५ हजार घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. इतक्या मोठ्या संख्येने मूर्ती काठानजिक विसर्जित केल्याने अनेक प्रश्न निर्माण होतात कारण काठाजवळ पाण्याची खोली सर्वात कमी असते. मूर्तींच्या पावित्र्याचाही प्रश्न उद्भवतो. त्यामुळे खोल पाण्यात सुरक्षित पद्धतीने आणि पावित्र्य जपत विसर्जन करण्याच्या हेतूने कन्व्हेअर बेल्ट या यांत्रिक सुविथेचा विचार केला आणि पुण्याच्या याच क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या ‘व्हिव्हीअन कन्व्हेअर्स ‘ च्या वैभव नाईक यांच्याशी संपर्क करून योजना सांगितली.

बातम्या आणखी आहेत...