आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:अनैतिक संबंधात अडथळा; प्रियकराच्या मदतीने आईनेच केला चिमुरडीचा खून

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महिलेसह प्रियकर अटकेत, दोघेही अकोल्याचे रहिवासी

खडकी पाेलिसांना तीन दिवसांपूर्वी एका ३ वर्षाच्या मुलीचा खून केलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली हाेती. या गुन्हयाचा तपास करत मुलीच्या आईसह प्रियकरास अटक केली आहे. अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने चिमुरडीचा आईनेच प्रियकराच्या मदतीने खून केला.

याप्रकरणी लक्ष्मी संताेष गवई (२६) व संताेष देवमन जामनिक (-२५, दाेघे रा.खेरपुडी, ता.बाळापूर, जि.अकाेला) यांना अटक केली आहे. दाेन मार्च राेजी खडकी रेल्वे स्टेशन ते खडबी बाजार रस्त्यावर सीएफडी मैदानाजवळ तीन वर्षाचा मुलीचा मृतदेह आढळला होता.

रेल्वे प्रवासातच केला मुलीचा खून आराेपी लक्ष्मी व संताेष हे अकाेला जिल्ह्यातील एकाच गावचे रहिवासी असून त्यांच्यात अनैतिक संबंध आहेत. गाव साेडून पुण्यास जाण्याचे त्यांनी ठरवले हाेते व १ मार्च राेजी ते गावातून पुण्यास येण्यासाठी निघाले. परंतु, लक्ष्मीने तिच्या साेबत ३ वर्षाची मुलगी आणल्याने रेल्वे प्रवासात त्यांच्यात भांडणे झाली. आराेपीने मुलीस पट्ट्याने मारहाण करत तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर ते दाेघे खडकी रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर त्यांग नी जवळील माेकळ्या मैदानात जाऊन मुलीचा मृतदेह टाकून ते पसार झाले.

बातम्या आणखी आहेत...