आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवीण दरेकरांचा दावा:2014 मध्ये 21 टक्के लोक गरीब होते; 2022 मध्ये लोकसंख्या वाढूनही हे प्रमाण 10 टक्क्यांच्या खाली

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस 8 वर्ष पूर्ण झाले आहेत. 2014 मध्ये 21 टक्के लोक गरीब होते; 2022 मध्ये लोकसंख्या वाढूनही हे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत खाली आले, असा दावा विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांची आज पुण्यात पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते.

भारताची वेगाने प्रगती

दरेकर म्हणाले, नरेंद्र मोदी सरकार 2014 मध्ये सत्तेवर आल्यानंतर गेल्या आठ वर्षात अनेक क्षेत्रात भारताची वेगाने प्रगती होत आहे. जम्मू-काश्मीरसाठीचे 370 वे कलम रद्द करणे, राममंदिराच्या उभारणीतील अडथळे दूर करणे, तिहेरी तलाक पद्धत रद्द करणे, नागरिकत्व सुधारणा कायदा मंजूर करणे या सारख्या निर्णयांमुळे अनेक वर्षांपासूनचे प्रश्न मोदी सरकारने निकालात काढले.

ईशान्य भारत हिंसाचारमुक्त

दरेकर म्हणाले, कायम अशांत असणाऱ्या ईशान्य भारताला हिंसाचार मुक्त केले. अंतर्गत सुरक्षा बळकट केल्यामुळे गेल्या आठ वर्षात काही अपवाद वगळता दहशतवाद्यांचा एकही मोठा हल्ला झाला नाही. सीमेवर झालेल्या आगळीकीला त्याच भाषेत उत्तर दिले गेल्यामुळे भारताकडे कणखर राष्ट्र म्हणून पाहिले जाऊ लागले आहे

10 टक्क्यांपेक्षाही कमी लोक गरीब

दरेकर म्हणाले, केंद्र सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीस आठ वर्ष पूर्ण झाले आहेत. 2014 मध्ये गरिबीखाली 21 टक्के लोक होते; सध्या लोकसंख्या वाढूनही 10 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. कोरोनाचा सामना करताना आरोग्य विभागातील पायभूत सुविधा सक्षम करण्यात आल्या. पंतप्रधान आवास योजना अंतर्गत तीन कोटी पेक्षा अधिक घराना मदत देण्यात आली.

15 नवीन एम्स

पाणी योजाना, शौचालय योजना , कर्ज वाटप, आयुष्मान भारत अंतर्गत वैद्यकीय उपचार, स्वच्छता अभियान, महा लसीकरण अभियान याकाळात राबवले गेले. 15 नवीन एम्स सुरू करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैदकिय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. शेतकरी सन्मान योजना अंतर्गत 11 कोटी शेतकऱ्यांना मदत देण्यात आली.

नवीन 80 विमानतळ

किसान क्रेडिट योजना, पीक विमा योजना अंतर्गत ही मोठी मदत पुरवली गेली. हमी भावाने रब्बी आणि खरीप पीक खरेदी करण्यात आली. उज्वला गॅस योजना, जनधन योजना, मुद्रा योजना यशस्वी ठरल्या आहे. नवीन शैक्षणिक धोरण अमलात आले. देशभर रस्ते निर्मिती जाळे उभारण्यात आले असून दिवसाला आज 37 किलोमीटर बांधकाम होत आहे. नवीन 80 विमान तळ उभारणी आणि 27 शहरात मेट्रो काम सुरू करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...