आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुळाधरण ओव्‍हर फ्लो:41 दिवसांत ‘मुळा’तून नदीत 16 टीएमसीवर पाणी विसर्ग

राहुरी8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१४ ऑगस्टला मुळाधरण तांत्रिकदृष्ट्या भरल्यानंतर धरणातून नदीपात्रात सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग रविवारी सकाळी थांबवण्यात आला. सोमवारपासून नवरात्र उत्सवाच्या घट स्थापनेला प्रारंभ होत असून या काळात घाटमाथ्यावर व धरणाच्या कमांड एरियात पाऊस झाल्यास मुळा नदीपात्रात पुन्हा पाणी सोडण्याची वेळ येणार आहे.

गेल्या ४१ दिवसांत मुळा धरणातून नदीपात्रात १६ हजार ८४८ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले. २००६ मध्ये मुळा धरणातून मुळा नदीपात्रात ३६ हजार १६६ दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते. १६ वर्षांत एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची ही दुसरी वेळ आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमतेचे मुळा धरण १४ ऑगस्टला तांत्रिकदृष्ट्या भरले होते. घाटमाथ्यावर तसेच कमांड एरियातील पावसाचे पाणी धरणात जमा होत असल्याने पाणीपातळी समान राहण्यासाठी धरणाच्या ११ मोऱ्यातून मुळा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू होता. नदीपात्राबरोबरच १४ ऑगस्टला मुळा उजवा व डावा कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. उजव्या कालव्यातून २ हजार ५६०, तर डावा कालव्यातून १३३ दशलक्ष घनफूट पाणी सोडल्यानंतर हे दोन्ही कालवे बंद करण्यात आले. २३ सप्टेंबरपासून घाटमाथ्यावर पाऊस मंदावल्याने धरणात येणाऱ्या नवीन पाण्याची आवक घटली. रविवारी कोतूळकडून धरणात ८४९ क्युसेकने पाण्याची आवक सुरू होती. धरणाचा साठा २५ हजार ६५० दशलक्ष घनफूट झाला होता.