आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिक्षा चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार:पुण्यात क्लास संपवून घरी जाताना घटना; मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यात 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी क्लास संपल्यानंतर घरी जाण्यासाठी एका रिक्षातून येत असताना, रिक्षा चालकाने तिला निर्जनस्थळी नेऊन अत्याचार केला. मुलीने त्याला विरोध केला असता, त्याने तिला चावा घेत पळ काढला. या घटनेमुळे शहरातील मुलींचा तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एैरणीवर आला आहे. या प्रकरणी एका अनोळखी रिक्षा चालकावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस त्याचा तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे.

या प्रकरणी मुलीच्या 39 वर्षीय आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार 4 जून रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान घडला आहे. त्यानुसार अनोळखी रिक्षा चालकावर बाललैंगिक अत्याचाराच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन पीडित मुलगी ही दोन दिवसांपूर्वी तीचा कोचींग क्लास आटोपून घरी येत होती. यासाठी तीने रिक्षा पकडला. यावेळी रिक्षा चालकाने मुलीने सांगितल्याप्रमाणे गोकुळनगर चौक येथे न सोडता तीला रिक्षामध्ये बसवून रिक्षा टिळेकरनगर रस्त्यावरील इस्कॉन टेंम्पलच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत नेली. त्यानंतर त्या ठिकाणी मुलीचा हात पडकून तिचा विनभंग केला. मुलींने प्रतिकार केला असता तीला चावा घेत तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तीने आरडा-ओरडा केल्याने तिला सोडून रिक्षाचालक फरार झाला. या घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत मुलीने घर गाठत हा प्रकार घरच्यांना सांगितला. यानंतर त्यांनी पोलिस ठाणे गाठत रिक्षा चालकाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...