आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजित पवारांचा भाजपला टोला:बारामतीत माझे काम बोलते, माझ्यापेक्षा जास्त काम करणारा आणा जनता विचार करेल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बारामतीमध्ये माझे काम बोलते. त्यामुळे तुम्ही जास्त काळजी करु नका. माझ्यापेक्षा जास्त काम करणारा बारामतीत आणा. त्याचा बारामतीकर नक्की विचार करतील. असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला.

पुढे अजित पवार म्हणाले, कावळ्याच्या शापाने कधी गाय मेलेली तुम्ही पाहिली आहे का? तसेच आहे नवीन, नवीन अध्यक्ष झाले की बारामतीत येतात कारण बारामतीत आल्यावर प्रसार माध्यमे बातमी उचलून धरतात. त्यामुळे नवीन अध्यक्षाची हवा नवीन नवीन असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

मविआचे सरकार असते तरी गणेशोत्सव निर्बंधमुक्त असता

अजित पवार गणेश विसर्जन मिरवणूक पार्श्वभूमीवर पुण्यातील गणेश मंडळांना भेटी देत आहेत. तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राज्यात यंदा गणेशोत्सवाची धामधूम आहे. दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमुळे गणेशोत्सव साजरा करता आला नव्हता. पण यंदाच्या गणेशोत्सवावर कोणतेही निर्बंध सरकारकडून घालण्यात आलेली नाही. त्यामुळे जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात असते तरी यंदा गणेश उत्सव निर्बंध मुक्त केला असता अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी दिली.

गणेश मंडळांना पवारांच्या भेटी

दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत.शुक्रवारी माजी उपमुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मित्र मंडळ, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मित्र मंडळ, मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ व काही सार्वजनिक मंडळाचे दर्शन घेतले व आरती केली.

बातम्या आणखी आहेत...