आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीमा - कोरेगाव प्रकरणात पोलिसच हॅकर्स?:रिपोर्टचा दाखला देत काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची चौकशीची मागणी

पुणे16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • Police hackers in Bhima Koregaon case? Citing the report, Congress spokesperson Sachin Sawant demanded an inquiry

सामाजिक कार्यकर्त्यांच्या अटकेमुळे देशभरात गाजलेल्या कोरेगाव भीमा प्रकरणात गंभीर माहिती पुढे आली आहे. या प्रकरणातील काही आरोपींच्या विरोधात पुणे पोलिसांनीच पुरावे पेरल्याचा आरोप महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी एका न्यूज पोर्टलच्या हवाल्याने केला आहे. महाविकास आघाडीने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

रिपोर्टरकडे वेधले लक्ष

कोरेगाव भीमा येथे 2018 साली झालेल्या दंगलींचा मुद्दा राज्यातील राजकारणात अजूनही धगधगत आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणांनीही सुरू केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही सामाजिक कार्यकर्त्यांना अटक केली असून, त्यांच्यावर दंगलीसाठी चिथावणी दिल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र, यातील काहींच्या विरोधात पोलिसांनी पुरावे पेरल्याचे समोर आले आहे. सचिन सावंत यांनी या संदर्भातील रिपोर्टकडे लक्ष वेधले आहे.

नेमके केले काय?

'जगभरातील पोलिस दले वेगवेगळ्या कारणांसाठी संगणक हॅक किंवा फोन टॅप करत असतात. भारतातील कोरेगाव भीमा प्रकरणात याचा वापर झाल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणातील किमान दोन आरोपींच्या संगणकामध्ये अज्ञात हॅकर्सनी पुरावे पेरल्याचे फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या विश्लेषणातून वर्षभरापूर्वी समोर आले होते. हे हॅकर्स आणि सरकारी यंत्रणांमध्ये संबंध असल्याचा दावा आता केला जात आहे. किंबहुना सरकारी यंत्रणांच्या सांगण्यावरूनच हे पुरावे प्लाण्ट करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

पुन्हा चौकशी करावी

सचिन सावंत यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी सरकारने या रिपोर्टच्या आधारे तात्काळ चौकशी सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. हे संपूर्ण प्रकरण म्हणजे सध्याच्या लोकशाहीच्या केविलवाणेपणाचे निदर्शक आहे. देशात कुणीही सुरक्षित नाही हेच यातून दिसतं, असं सावंत यांनी म्हटले आहे.

फिशिंग ई मेलचा वापर

फॉरेन्सिकच्या वर्षभरापूर्वीच्या दाव्याचा संदर्भात सेन्टिनेल वन आणि नॉनफायर्स सिटिझन लॅब आणि अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या सुरक्षा संस्थांनी पाठपुरावा केला. कोरेगाव भीमा प्रकरणातील बनावट पुराव्याचा संबंध एका व्यापक हॅकिंग ऑपरेशनशी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याद्वारे अनेकांना लक्ष्य करण्यात आले होते. फिशिंग ई मेलचा वापर करून स्पाय वेअरसह विशिष्ट संगणकांना लक्ष्य करण्यात आले. इस्रायली हॅकिंग कॉन्ट्रॅक्टर एनएसओ ग्रुपने विकलेले स्मार्टफोन हॅकिंग टूल्स देखील यात वापरल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा दंगलीचा कट रचल्याच्या प्रकरणात वरवरा राव व रोना विल्सन अटकेत आहेत. तसेच सुरेंद्र गडलिंग हे देखील एक आरोपी आहेत. पैकी गडलिंक आणि विल्सन यांचे संगणक हॅक करण्यात आल्याचा दावा संबंधित वेब पोर्टलच्या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...