आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे शहरातील औंध, सानेवाडी, गायकवाड आयटी पार्क येथे एका इमारतीच्या टेरेसवर असणाऱ्या हॉटेलमधे बुधवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाची पाच वाहने व जवानांच्या साह्याने एक तासात ही आग विझवली असून, यात कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन दलाचे अधिकारी शिवाजी मेमान यांनी सांगितले.
कर्मचाऱ्यांची धावपळ
औंध परिसरात गायकवाड आयटी पार्क ही आठ मजली इमारत आहे. सदर इमारतीच्या टेरेसवर ' ट्रू ट्रंप ट्रंक ' हे हॉटेल आणि बार आहे. सदर इमारतीच्या बांधकामावेळी अग्निशमन व्यवस्थै निर्माण करण्यात आलेली आहे. बुधवारी सकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास अचानक टेरेस हॉटेलमधून धूर येऊ लागल्याचे दिसून आले. त्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आणि ते टेरेसवरून बाहेर पडले. काही वेळातच अचानक आगीने रौद्र रूप धारण केले.
शॉर्ट सर्किटमुळे आग
याबाबतची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षास मिळाल्या नंतर अग्निशमन दलाची पाच वाहने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमनदलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. परंतु आगीने भीषण रूप धारण केले असल्याने आग लवकर आटोक्यात येत नव्हती. अखेर एक तासाच्या प्रयत्नाने आग विझविण्यात अग्निशमन दलास यश मिळाले. पावणे सात वाजण्याच्या सुमारास आग विझवल्यानंतर कुलिंगचे काम करण्यात आले. दरम्यान या घटनेत हॉटेल संपूर्णपणे जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर ठिकाणची फायर सिस्टीम बंद स्थितीत असल्याचे ही दिसून आले आहे. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.