आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी ॲण्ड कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन (एम. फक्टो) व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेच्या वतीने सोमवारी सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर प्राध्यापकांमार्फत धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनासाठी स्पुक्टो कार्य क्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक उपस्थित राहिले आहेत.
4 फेब्रुवारी 2013 ते 10 मे 2013 या कालावधीत केलेल्या परीक्षा बहिष्कार आंदोलनामुळे बेकायदेशीररित्या कापलेल्या 71 दिवसांच्या पगाराचा परतावा उच्च न्यायालयाच्या व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी या प्राध्यापकांची आहे.
याशिवाय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या दिनांक 18 जुलै 2018 च्या रेग्युलेशननुसार समग्र योजना जशीच्या तशी लागू करणे बंधनकारक असल्याने महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारच्या अटी व शर्तीचा भंग केला आहे. त्यामध्ये ताबडतोब दुरुस्ती करावी. अर्धवेळ महाविद्यालयीन शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा.
युजीसीच्या धोरणानुसार महाविद्यालय व विद्यापीठातील प्राध्यापकांची शंभर टक्के रिक्त पदे भरण्यात यावीत.सहसंचालक व वरिष्ठ लेखा परीक्षक यांच्या मनमानी कारभाराला आळा घालावा. एम फिल पदवी प्राप्त व 1992 ते 2010 में नियुक्त प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा. प्राध्यापकांना कँसचे लाभ वेळेत मिळावेत. इत्यादी मागण्यांसाठी प्राध्यापक धरणे आंदोलन करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.