आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रीस खेळ चाले:पुण्यात दिसला बिबट्या; खडकवासला परिसरातील व्हिडीओ समोर, नागरिकांमध्ये भीती

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुण्यातल्या खडकवासला परिसरात पुन्हा एकदा बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

वनविभागाने तातडीने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पुढे येताना दिसत आहे. या बिबट्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

कुठे दिसला बिबट्या?

खडकवासला गावातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी या गावातील बिबट्याचा हा मंगळवारी रात्रीचा व्हिडीओ आहे. संरक्षण दलाशी संबंधित ही संस्था असून या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राखण्याच्या क्वार्टर्स संस्थेच्या परिसरातच आहेत. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत रात्री बिबट्या आल्या होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातारण आहे.

यापूर्वीही घडल्या घटना

पुण्यातील मर्सिडीज बेंझ कंपनीत काही दिवसांपूर्वी बिबट्या घुसल्याची घटना घडली होती. तर हडपसरमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या तरुणावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी होताना दिसतेय.

कसे टाळता येईल?

दिवसेंदिवस वन्य-प्राणी आणि मानवातला संघर्ष तीव्र होताना दिसतोय. मनुष्याने जंगलामध्ये अतिक्रमण केले. त्यामुळे बिबट्याचा अधिवास संपुष्टात येताना दिसतोय. शिकारीच्या शोधात बिबटे शहरात प्रवेश करताना दिसतायत. हे टाळण्यासाठी आपल्यालाही थोडे सजग व्हावे लागेल. वनसंपदा जपावी लागेल, अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञ व्यक्त करतायत.

बातम्या आणखी आहेत...