आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंधश्रद्धेची बळी:प्रसव वेदनेनंतर डॉक्टरकडे सोडून मांत्रिकाकडे गेले; त्याने एवढे मारले की, महिलेसह तिच्या बाळाचा झाला मृत्यू

पुणे5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मांत्रिकाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे

लोणावळ्याच्या ग्रामिण मावळ परिसरात एका गर्भवती महिलेला डिलीव्हरीपूर्वी रुग्णालयात घेऊन जाण्याऐवजी सासरच्या लोकांनी एका मांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाने प्रसुती वेदना दूर करण्याच्या नावावर महिलेला मारहाण केली. यामुळे ती महिला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेचा पती, तिचे सासरचे लोक, दिर आणि मांत्रिकाविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 2013 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास करणारे लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे निरीक्षक संदीप घोरपडे म्हणाले, 'दीपाली बिक्कर 8 महिन्यांची गरोदर होती आणि 10 फेब्रुवारीला तिला प्रसूतिवेदना झाली. महिलेचा पती महेश बिक्करने तिला त्याच्या आईवडिलांच्या सांगण्यावरून रुग्णालयाऐवजी एका तांत्रिककडे नेले. त्यावेळी महेशचा भाऊ आणि त्याची पत्नीही तेथे होते. 11 महिन्यांपूर्वी दीपालीचे लग्न झाले होते.

रुग्णालयात नेण्याची विनवणी करत राहिली महिला
इंस्पेक्टर घोरपडे म्हणाले की, वेदनांनी व्हिवळत दीपालीने तिच्या पतीला तिला रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले, पण तो तयार नव्हता. दीपालीचा भाऊ संतोष म्हणाला, 'माझ्या बहिणीला जाणीवपूर्वक तिच्या सासरच्या लोकांनी तांत्रिककडे नेले. तिने (बहिणीने) अनेकदा आग्रह धरला की तिला दवाखान्यात घेऊन जावे, परंतु पतीने तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर प्रचंड वेदनांनी तिचा मृत्यू झाला. '

आंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य मिलिंद देशमुख म्हणाले की आम्ही संतोषला लोणावळा पोलिस स्टेशनमध्ये नेले आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना 10 फेब्रुवारीची आहे आणि या प्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी सध्या फरार आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली आहेत.

बातम्या आणखी आहेत...