आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील एका सर्वेअर अधिकाऱ्याला साडेतीन लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजाेडीअंती तीन लाख रुपये मागणी करताना सापळा रचून रंगेहाथ बुधवारी अटक केली आहे. एका कंपनीचे विकास याेजनेचा अभिप्राय देण्यासाठी सदर लाचेची मागणी करण्यात आल्याची माहिती एसीबीने दिली आहे.
संदीप फकीरा लबडे (वय-48,रा.पिंपरी चिंचवड) असे याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आराेपी अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत 38 वर्षीय तक्रारदार याने एसीबीकडे तक्रार दाखल केली आहे. संदीप लबडे हा पिंपरी चिंचवड मनपात नगर रचना व विकास विभागात वर्ग तीन पदावर सर्वेअर म्हणून काम करत आहे. तक्रारदार हे काम करत असलेल्या कंपनीचे विकास याेजनेचा अभिप्राय (डी.पी.आेपिनयन) देण्यासाठी साडेतीन लाख रुपये लाचेची मागणी केली.
तडजाेडीअंती तीन लाख रुपयांची मागणी बुधवारी संदीप लबडे करत असताना एसीबीने त्यास सापळा रचून अटक केली आहे. सदर कारवाई एसीबीचे पोलिस अधिक्षक राजेश बनसाेडे, अपर पोलिस अधीक्षक सूरज गुरव, पोलिस उपअधीक्षक क्रांती पवार, पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलिस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, पाेहवा आयचित, पाेहवा वेताळ, पाेना वैभव गाेसावी, पाेशि दिनेश माने, पाेशि साैरभ महाशब्दे, पाेशि वाळके, पाेशि कदम, पाेशिप पाडुंरंग माळी यांचे पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.