आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्रीचा थरार:पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून कंत्राटदारांना लुटले; पोलिसांनी संशयिताला केले अटक

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोयत्याचा धाक दाखवून कंत्राटदारांना अडवून त्यांच्याकडील 18 हजारांची रोकड चोरणाऱ्या टोळक्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना गुरुवारी (28 जुलै) रात्री एकच्या सुमारास खडकीतील मुळा रस्ता सर्कल परिसरात घडली.

हे आहेत आरोपी

सागर अशोक जगताप (वय 30), सुजीत सुधीर म्हस्के (वय 27) शुभम राजेश कदम ( वय 24), राहूल धर्मपाल यादव (वय 21) ,सतीश शिवकुमार यादव (वय 31 सर्व रा. खडकी ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रामचंद्र रतन शिंदे (वय 40 ) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मध्यरात्री घडला प्रकार

रामचंद्र शिंदे आणि अतुल बाभळे हे कंत्राटदार असून पुणे महानगरपालिकातंर्गत ड्रेनेज व पाईप लाईन टाकण्याचे काम करतात. खडकी परिसरातील होळकर पुल ते चिखलवाडीत पिण्याचे पाईप लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. रामचंद्र आणि अतुल 28 जुलैला रात्री साडेबाराच्या सुमारास कामगारांसह पाईप घेउन निघाले होते. त्यावेळी मुठा रस्ता परिसरात टोळक्याने त्यांना अडवून कोयत्याचा धाक दाखवला. त्यांच्याकडील 18 हजारांची रोकड, मोबाइल पाकीट चोरून नेले. याप्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपींचा माग काढून अटक केली.

रक्कम दुप्पट करण्याच्या आमिषाने फसवणूक

गुंतवलेली रक्कम दुप्पट करण्याच्या आमिषाने 30 ते 35 महिलांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लष्कर पोलिसांकडून तीन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरती ठाकूर उर्फ कृष्णाबेन, नाजमा सय्यद, सुमेरा सय्यद अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित महिलांची नावे आहेत. याबाबत एका महिलेने लष्कर पोलिस ठाण्यात गुरवारी तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला लष्कर भागात राहायला आहेत. त्यांची आरोपी ठाकूर, सय्यद यांच्याशी ओळख झाली होती. आरोपी महिलांनी त्यांना पंधरा दिवसात रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवले होते.चौकशीत आरोपी महिलांनी अशाच पद्धतीने 30 ते 35 महिलांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले असून सहाय्यक पोलिस निरीक्षक एस जाधव याबाबत पुढील प्रकरणाचा तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...