आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात मसाज पार्लरच्या आड सुरू होता कुंटणखाना:परदेशी तरुणीसह पोलिसांकडून तिघींची सुटका; चौघांवर गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-सिंहगड राेड रस्त्यावरील नांदेड सिटी डेस्टीनेशन सेंटर माॅल मधील ब्लु बेरी स्पा मसाज सेंटरवर पुणे ग्रामीण पाेलिसांच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या एका परदेशी व दाेन स्थानिक तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका केली आहे. याप्रकरणी मसाज सेंटर मालक व व्यवस्थापक अशा एकूण चाैघांवर पिटा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलि​​​​​​सांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचे पाेलीस निरीक्षक विजयसिंह चाैहान यांनी दिली आहे.

मुंजा रामदास शिंदे (वय-31१,रा.वडगाव, ता.हवेली.पुणे), याेगेश पवार (रा.नांदेड गाव, ता.हवेली,पुणे), अर्थव प्रशांत उभे (19,रा.धायरी,पुणे) व ज्याेती विपुल वाळींबे (30,रा.नऱ्हे, पुणे) या आराेपींना अटक करण्यात आली आहे. हवेली पाेलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे ग्रामीण पोलिसां​​​चे पथक पेट्राेलिंग करत असताना, पोलिस उपनिरीक्षक सुधीर घुले यांना माहिती मिळाली की, उच्चभ्रु समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी येथील डेस्टीनेशन सेंटर माॅलचे पहिल्या मजल्यावरील ब्लु बेरी स्पा मसाज सेंटर मध्ये मसाजच्या नावाखाली परदेशी तरुणीकडून वेश्याव्यवसाय सुरु असल्याची माहिती मिळाली हाेती. त्याप्रमाणे पोलिसांनी खातरजमा करण्यासाठी त्याठिकाणी बनावट गिऱ्हाईक पाठवला. तेथे मसाजच्या नावाखाली एक्स्ट्रा सर्व्हिसेसच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरु असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून छापा टाकला.

त्यावेळी सदर ठिकाणी मसाज सेंटर चालविणारा एक मालक, दाेघे मॅनेजर तसेच एक परदेशी व दाेन स्थानिक पिडित तरुणी मिळून आल्या. सदर पिडित तरुणींना जादा पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त करुन मसाज सेंटरच्या स्पा च्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे निष्पन्न झाले आहे. मसाज सेंटर मध्ये मिळून आलेल्या तीन तरुणींना महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

याप्रकरणात मुख्य आराेपी याेगेश पवार हा पसार झाला अैसून त्याचा शाेध घेण्यात येत आहे. सदरची कारवाई पुणे जिल्हा पोलिस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख, अपर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजयसिंह चाैहान, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सुधीर घुले, सहा.पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, जितेंद्र शेवाळे, महिला हवालदार ज्याेती बांभळे, पूनम कांबळे, सिमा जगताप यांच्या पथकाने केली आहे.

बातम्या आणखी आहेत...