आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • In Pune, A Man First Killed His Wife And Child And Then Hanged His Life, He Was Unemployed Due To The Lockdown; News And Live Updates

कोरोनामुळे वाढत आहे मानसिक ताणतणाव:पुण्यात एका व्यक्तीने प्रथम पत्नी आणि मुलांची केली हत्या, त्यानंतर गळफास घेत केली आत्महत्या; लॉकडाऊनमुळे झाला होता बेरोजगार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोलापुरचा राहणार हा शिंदे परिवार पुण्यातील काळभोर भागात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहत होता.

देशात कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून कित्येक लोक बेरोजगार झाले आहे. दरम्यान, अनेक लोक याकाळात मानसिक ताणतणावातून जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे येथील एका व्यक्तीने बेरोजगारीला कंटाळून प्रथम पत्नीचे आणि निष्पाप मुलांची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर स्वत: गळफास घेत जीवन संपवले.

ही घटना पुण्यातील (ग्रामीण) काळभोर भागात घडली असून रविवारी संध्याकाळी ते तिघेही आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आले आहे. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच लोनी काळभोर पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी मृतदेहांना ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे.

शिंदे कुटुंब मूळचे सोलापूरचे
लोनी काळभोर पोलिस स्टेशनच्या माहितीनुसार, शिंदे कुटुंब मूळचे सोलापूरचे आहे. नोकरीच्या संदर्भात तो गेल्या वर्षापासून कदमवाड टाउनशिपमध्ये राहायला आला होता. परंतु, कोरोनामुळे नोकरी गेल्यावर तो बेरोजगार झाला होता. दरम्यान, या काळात त्याच्यावर उपासमारीचे वेळ आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, हनुमंता शिंदे (वय 38), पत्नी प्रज्ञा शिंदे (वय 28) आणि लहान मुलगा शिवतेज (1 वर्ष) असा त्यांचा परिवार होता.

आर्थिक संकटांशी झगडत होता हनुमंता - पोलिस
लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे प्रभारी राजेंद्र मोक्सी म्हणाले की, 'बेरोजगारीमुळे हनुमंताची आर्थिक परिस्थिती दयनीय होत चालली होती. त्यामुळे त्याने आधी आपल्या पत्नीचा गळा आवळून धारदार शस्त्राने हत्या करत दुसर्‍या खोलीत जाऊन स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. त्यानंतर हनुमंताचे वडील दर्याप्पा अर्जुन शिंदे यांच्या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 302 (खून) आणि 309 (आत्महत्या करण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...