आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नकार दिल्याचा राग:पुण्यात अल्पवयीन मॉडेलला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन रॅपरने केला बलात्कार, गुन्हा दाखल आणि आरोपी फरार

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नकार दिल्याने नाराज होता आरोपी रॅपर

पुण्यात एका रॅपरला अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. या मुलीला मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा होती. मुलीला भूल देण्याचे इंजेक्शन देऊन बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी युवकाविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या तपास सुरू असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

नकार दिल्याने नाराज होता आरोपी रॅपर
28 वर्षीय आरोपीचे नाव समीर विजय भालेराव उर्फ ​​डोनी सिंह असे आहे. आरोपी समीर हा रॅपर असून त्याने अनेक मुलींना मॉडेलिंगचे काम दिले आहे. पीडित मुलीला देखील मॉडेलिंगची आवड होती. अशा प्रकारे दोघेही एकमेकांच्या संपर्कात आले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री वाढली. दरम्यान, आरोपी समीरने काही दिवसांपूर्वी पीडितेला एकतर्फी प्रेमात प्रपोज केले, जे मुलीने नाकारले. असा आरोप आहे की, यामुळे संतापलेल्या समीरने पीडितेच्या घरी जाऊन तिच्या भावाला धमकी दिली. यानंतर, त्याने जबरदस्तीने अल्पवयीन मुलीला सोबत नेले आणि तिला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन तिच्यावर बलात्कार केला.

शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने गुन्हा दाखल केला
शुद्धीवर आल्यानंतर पीडितेने हिंजवडी पोलिस ठाण्यात जाऊन आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. पीडितेच्या तक्रारीनंतर समीरविरुद्ध बलात्कार, जीवे मारण्याची धमकी यासह अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...