आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंबित करण्याचे आदेश:पुण्यात पोलिस अधिकाऱ्याने प्रेयसीच्या पतीला धमकावले

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधिकाऱ्याने प्रेयसीच्या घरात बळजबरीने घुसून तिच्या पतीस पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रवीण नागेश जर्दे याच्यावर कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अतिरिक्त पोलिस आयुक्त डाॅ. जालिंद सुपेकर यांनी आरोपी पोलिस उपनिरीक्षकास पुणे पोलिस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

याबाबत एका ४३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. तक्रारदाराच्या पत्नीचे उपनिरीक्षक जर्दे यांच्याशी काही वर्षांपासून अनैतिक संबंध होते. त्यामुळे तक्रारदाराने पत्नीला संबंध तोडण्यास सांगितले होते. पत्नीने जर्देला याबाबत माहिती दिली. त्यानंतर जर्दे तक्रारदाराच्या घरात बळजबरीने शिरला. तक्रारदाराची आई आणि मुलांना त्याने शिवीगाळ केली. यापुढे पत्नीला काही बोललास तर गाठ माझ्याशी आहे, असा दम भरून त्याच्या डोक्याला पिस्तूल लावले.