आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • In Pune, A Sweetheart Stabbed Her Boyfriend To Death Along With His Family, Incident In Warje Area, 5 Family Members Arrested| Mararhi News

प्रेमप्रकरणातून खून:पुण्यात प्रेयसीने कुटुंबीयांसह प्रियकराला डांबून ठार केले, वारजे भागातील घटना, कुटुंबातील 5 जण अटकेत

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वारजे माळवाडी परिसरात १६ मार्च रोजी प्रद्युन्म कांबळे (२१) या तरुणाचा प्रेमप्रकरणातून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली हाेती. पोलिसांनी या प्रकरणाचा सखाेल तपास केला असता, ब्रेकअपनंतरही प्रियकर सतत त्रास देत असल्याने प्रेयसीने त्याला बोलावून घेत कुटुंबासह खोलीत डांबून मारहाण करून खून केल्याची बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसीसह ५ जणांना अटक केली आहे.

अजय विजय पायगुडे (१९), विजय किसन पायगुडे (५०), वंदना विजय पायगुडे (४०), प्राजक्ता विजय पायगुडे (१९) आणि सागर गाेविंद राठाेड (२१, सर्व रा.वारजे, पुणे) यांना अटक करण्यात आली. प्राजक्ता ही कोथरूड परिसरात राहत होती. तिच्या घराजवळ प्रद्युन्म याचे घर हाेते. काही दिवसांनी दाेघांत प्रेमसंबंध जुळले. मात्र, ही बाब कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी कोथरूड येथून घर वारजेला स्थलांतरित केले. तरीदेखील तो सातत्याने तिचा पाठलाग करू लागला. तिने त्याला अनेकदा समजावून सांगितले. तो तिला वारंवार त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिने १६ मार्च रोजी फाेन करून त्याला वारजे येथे घराजवळ बाेलावून घेतले.

चार तास डांबून केली मारहाण
प्रद्युम्न त्या ठिकाणी गेल्यानंतर प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी त्याला एका खाेलीत चार तास डांबून ठेवले. सर्वांनी शस्त्र, सिमेंटचा गट्टू, लाेखंडी राॅड आदी हत्यारांचा वापर करून त्याला ठार केले. नंतर त्याचा मृतदेह रस्त्यावर फेकून देण्यात आला होता. प्राजक्ता पायगुडे ही तरुणी नर्सिंगचे शिक्षण घेत असून गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्यानंतर तिला अटक करण्यात आल्याची माहिती सहायक पोलिस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...