आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिलेसोबत एकत्रितपणे काढलेला सेल्फी नवऱ्याला पाठविण्याची धमकी देत बलात्कार केल्याचा प्रकार तळवडे व वाल्हेकरवाडी येथे घडला आहे. तसेच आरोपीने महिलेकडून ब्लॅकमेल करत वेळोवेळी पैसेही घेऊन ते परत केलेले नाही. पीडित महिलेने या प्रकरणी गुरुवारी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सलीमुद्दील अलीमुद्दील खान (वय 32, मूळ रा. बबनान जिल्हा बस्ती, उत्तरप्रदेश) या आरोपीच्या विरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकार हा 8 मे 2017 ते आजपर्यंत यादरम्यान घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या एका जवळील नातेवाईकाच्या लग्नासाठी उत्तरप्रदेशातील त्यांच्या मुळ गावी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी आणि त्यांची ओळख झाली.
जीवे मारण्याची धमकी
ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. तसेच मोबाईलमध्ये एक सेल्फी काढला. हा फोटा तुझ्या नवऱ्याला पाठवेल, असे धमकावत आरोपीने 2019 मध्ये फिर्यादी महिला यांना तळवडे येथील एका लॉजवर नेऊन त्यांच्यावर बलात्कार केला. तेथे त्यांचा अश्लिल व्हिडीओ रेकॉर्ड केला.
हा व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देत आरोपीने वेळोवेळी फिर्यादी महिलेवर बलात्कार केला, असे पिडीत महिलेने तक्रारीत सांगितले. याबाबत चिखली पोलिस पुढील तपास करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.