आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेहू देवस्थान संस्थानामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतसाठी एक साधी, तर दुसरी डिझायनर पगडी तयार करण्यात येत आहे. मात्र, यातील डिझायनर पगडीवर आणि उपरण्यावर तुकोबांच्या अभंगातील ओळी लिहिल्यामुळे वाद निर्माण झालाय. त्यामुळे त्या ओळी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पगड्या तयार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जगतगुरू संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा उद्या पार पडणार आहे. पंतप्रधानांची ही भेट विशेष बनविण्यासाठी देवस्थान संस्थेतर्फे डिझायनर तुकाराम पगड्या आणि उपरणे तयार करण्यात येत आहेत. देहू संस्थानने विश्वस्तांच्या विनंतीनुसार पुण्यातील सुप्रसिद्ध मुरूडकर झेंडेवाले यांच्या कला वर्कशॉपमध्ये या पगड्या तयार केल्या जात आहेत.
अन् ओळी बदलल्या...
तप्रधानांसाठीच्या सुरुवातीला या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या ओळी होत्या. परंतु, यावर आक्षेप घेतला गेला आहे. यामुळे देवस्थानाने आता या ओव्या बदलण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वीच्या ओव्यांऐवजी आता पगडीवर 'विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ' या ओव्या लिहिल्या गेल्या आहेत. मेट्रो उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधानांना महापालिकेकडून देण्यात आलेल्या फेट्यावर शिवमुद्रा होती. मात्र, त्याला आक्षेप घेतला गेल्याने तीही काढण्यात आली होती. आणि आता दुसऱ्यांदा पगडीवरील ओळी बदलण्यात आल्याचा समोर येत आहे. दरम्यान देहू येथील मंदिर बंद ठेवण्याच्या निर्णयावरून आक्षेप घेण्यात आला होता. तसेच देहूत त्यांच्या स्वागतासाठी लावलेल्या पोस्टरवरूनही वाद निर्माण झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या पगडीसाठी निवडलेला अभंग चुकीचा होता. त्यातून चुकीचा अर्थ निघत होता. याचा आक्षेप मी देहू संस्थानकडे नोंदवला. त्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. वाद विकोपाला जाण्यापूर्वी पगडीवरील अभंगाच्या ओळी बदलण्यात आल्या आहेत.
- प्रमोद माने, चित्रकार, देवगाव
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.