आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • In Pune District, 56 Lakh Population Will Be Checked Through 4000 Teams Under Joint Leprosy And Tuberculosis Screening Campaign.

पुणे जिल्ह्यात संयुक्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध:अभियान अंतर्गत 4 हजार पथका मार्फत 56 लाख लोकसंख्येची होणार तपासणी

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुष्ठरोग व क्षयरोगाच्या जनजागृतीसाठी जिल्ह्यात 13 ते 30 सप्टेंबर या कालावधीत रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. आशा कार्यकर्ती व पुरूष स्वयंसेवकांचे पथक तसेच आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन क्षयरोग व कुष्ठरोगाच्या लक्षणांची तपासणी करण्यासह माहिती घेणार आहेत. संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियानात पुणे जिल्ह्यात 4 हजार 117 पथकांची नेमणूक करण्यात आली असून नागरी व ग्रामीण भागातील मिळून 56 लाख लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी याबाबतच्या नियोजनाचा आढावा घेतला. यावेळी आरोग्य विभागाचे सहायक संचालक डॉ.एच.ऐ.पोटे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुनील पोटे, जिल्हा परिषदेचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.सचिन एडके आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नवीन रुग्ण रोगाच्या सुरुवातीच्या टप्यायतच ओळखून उपचाराखाली यावा यासाठी सर्व नागरिकांना याबाबतची प्राथमिक माहिती सातत्याने देण्यात येत आहे. कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत आरोग्य शिक्षण, लवकर निदान, लवकर उपचार याप्रमाणे नियोजन करून रोगप्रसाराची साखळी खंडित करण्यासाठी हे अभियान महत्वाचे ठरणार आहे.

629 कुष्ठरुग्ण औषधोपचाराखाली

पुणे जिल्हयात ऑगस्ट 2022 अखेर 629 कुष्ठरुग्ण औषधोपचाराखाली आहेत. कुष्ठरोग दर हा प्रति दहा हजार लोकसंख्येत 0.53 इतका आहे. एप्रिल 2022 ते ऑगस्ट 2022 अखेर 209 इतके नवीन कुष्ठरुग्ण शोधण्यात आले असून ते नियमित औषधोपचाराखाली आहेत. संयुक्त कुष्ठरुग्ण शोध अभियानात जिल्ह्यात 4 हजार 117 पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. नागरी व ग्रामीण भागातील मिळून 56 लाख लोकसंख्येची तपासणी करण्यात येणार आहे. कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध अभियान कालावधीत घरोघरी तपासणी करण्यात येणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...