आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • In Pune Due To VIP Traffiec Jam| Crowd Of Devotees On The Occasion Of Ganeshotsav | Tiredness Of Citizens While Searching For The Way

पुण्यात व्हीआयपींच्या दौर्‍यामुळे वाहतुक कोंडी:गणेशोत्सवानिमित्त भक्तांची गर्दी, मार्ग शोधताना नागरिकांची दमछाक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात एकीकडे गणेशोत्सवानिमित्त भक्तांची गर्दी होत असताना दुसरीकडे व्हीआयपींच्या दौर्‍यामुळे पुणेकर नागरिकांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला. नागरिकांची पर्यायी मार्ग शोधताना दमछाक झाली.

शुक्रवारी शहरात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिराधित्य सिंधिंया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह इतर व्हीआयपींचा दिवसभर राबता होता. तसेच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही वाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी एकेरी वाहतुक करण्यात आली आहे. त्यामुळे ठरावीक रस्त्यावरच रहदारी होत असल्यामुळे पुणेकरांना मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला.

8 ते 9 व्हीआयपी व्यक्ती एकाचवेळी शहरात

शुक्रवारी दिवसभर शहरात व्हीआयपी मान्यवर एका ठिकाणांहून दुसर्‍या ठिकाणच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवत होते. आठ ते नऊ व्हीआयपी व्यक्ती एकाचवेळी शहरात आल्यामुळे त्याचा ताण वाहतुक पोलिसांवर पडल्याचे दिसून आले. त्यांच्या मार्ग मोकळा करून द्यावा लागत असल्यामुळे काही ठिकाणी वाहतुक थांबवावी लागत होती. त्यामुळे शहरातील मध्यवस्तीसह इतर ठिकाणी कोंडी झाल्याचे दिसून आले.

पर्यायी मार्ग उपलब्ध

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शहरातील महत्वाच्या रस्त्यावर मेट्रोचे काम सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी रस्ते लहान झाले आहेत. तर काही ठिकाणी पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे देखील मोठी वाहतुक कोंडी शहरात पहावयास मिळाली. अशातच आता शनिवार आणि रविवार सुट्या लागून आल्यामुळे मोठ्या संख्येने नागरिक देखावे पाहण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस तर पोलिसांना वाहतुकीचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.

ई-बसचे लोकार्पण

महापालिका भवन परिसरात शुक्रवारी सायंकाळी कोंडी झाली. तासभर कोंडीत अडकलेल्या पडल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर ई-बस महापालिका भवन परिसरात आणण्यात आल्या. ई-बस महापालिका भवन येथील पीएमपी स्थानकात आल्यानंतर या भागातील वाहतूक विस्कळीत झाली.

जंगली रोडवर वाहनांच्या रांगा

जंगली महाराज रस्ता तसेच महापालिका भवन, कुंभारवाडा परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तासभर वाहनचालकांना कोंडीत अडकावे लागल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्याच बरोबर अलका चौक, कुमठेकर चौक, लक्ष्मीरोड, मध्यवस्तीतील पेठा, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, मंडई परिसर, टिळक रस्ता अशा विविध परिसरात दिवसभर सातत्याने गर्दी पहावयास मिळाली.

बातम्या आणखी आहेत...