आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे:लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीची गळा आवळून केली हत्या, गर्भवती झाल्याने होता नाराज; स्वतः पोलिसांना केला शरण

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी दोन वर्षांपासून प्रेयसीसोबत या घरात राहत होता
  • आरोपी महिलेसोबत दोन वर्षांपासून लिव्ह इनमध्ये होता, महिलवर गर्भपातासाठी टाकत होता दबाव

पुण्यातील रांजणगाव भागात लिव्ह इन पार्टनरने महिलेची गळा दाबून हत्या केली. यानंतर आरोपीने पोलिस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले. शनिवारी ही घटना घडला. प्रेयसीने गरोदर राहिल्याने आरोपी संतप्त झाला होता.

आरोपी दोन वर्षांपासून महिलेसोबत लिव्ह इन मध्ये होता

पुणे पोलिसांनुसार, रांजणगाव औद्योगिक परिसरातील कोरेगाव भागात किरण फुंदे प्रेमिका सोनामनी सोरेनसोबत मागील दोन वर्षांपासून लिव्ह इन मध्ये राहत होता. प्रेमिक गर्भवती असल्याचे त्याला दोन दिवसांपूर्वी समजले. किरणला हे मूल नको होते. त्याने सोनामनीवर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. पण तिने ऐकली नाही. अखेर हा टोकाला गेला आणि दोघांमध्ये वाद झाला. यानंतर किरणने तिची गळा आवळून हत्या केली.

आरोपीने स्वतःसाठी फाशीची शिक्षा मागितली

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात आरोपी आपला गुन्हा मान्य केला आणि मला फाशी देण्याची विनंती केली. पोलिस स्टेशनमध्ये एक पत्र लिहून संपूर्ण घटना सांगितली.

0