आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खडकवासलातला पाणीसाठा निम्म्यावर:पुण्यात 4 धरणांत मिळून केवळ 3.29 टीएमसी पाणी; आता डोळे दमदार पावसाकडे

पुणे2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत निम्म्यापेक्षाही कमी आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण साखळीत गेल्या तीन-चार दिवसांपासून पाऊस पडत असला, तरी सध्या चारही धरणांत मिळून केवळ 3.29 टीएमसी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी हाच साठा 7.84 टीएमसी होता.

6% सरासरी पाऊस

खडकवासला धरण साखळीच्या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या महिनाभरात आजपर्यंत, खडकवासला परिसरात 10.5 मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या केवळ 6 टक्‍के आहे. दुसरीकडे यंदाचा उन्हाळा गेल्या 122 वर्षांत सर्वात प्रखर होता. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवनही वेगाने झाले झाले आहे. त्यातच यंदा पूर्व मान्सून पावसानेही पाठ फिरवल्याने याचा परिणात धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यावर झाला आहे.

महापालिकेची अधिकाऱ्यांशी चर्चा

पुणे शहराला जास्त पाणी मिळण्याबाबत महापालिकेने जलअभ्यासक तसेच पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. यावेळी या अधिकाऱ्यांनी भीमा उपखोऱ्यातून कोकणाकडे नाल्यांद्वारे जाणारे पाणी पश्‍चिम खोऱ्यात वळवल्यास 2 ते 3 टीएमसी पाणी वाढेल तसेच टाटा पॉवर कंपनी मागील 100 वर्षापासून भीमा खोऱ्यातील पाणी जलविद्युत निर्मितीसाठी वापरत असून वीजेच्या निर्मितीनंतर हे पाणी कोकण प्रदेशांत वापरले जाते.

कोकण खोरे हे विपुल जलसंपत्तीचे खोरे आहे. मात्र उर्ध्व भीमा खोरे हे तुटीचे खोरे असल्याने व पुणे शहराची वाढती लोकसंख्या शहराकडे होणारे स्थलांतर व व्यापक पायाभूत सुविधांची व रहिवाशी इमारतींची बांधकामे यांची गरज लक्षात घेता पश्‍चिमेकडून 8-10 टीएमसी पाणी पूर्वेकडे वळवून पावसाळ्यानंतर खडकवासला प्रणालीमध्ये उपलब्ध करुन दिल्यास पुणे शहरासाठी उपयोगी आणता येईल, अशी उपाय योजना महापालिकेने शासनास सुचविली आहे.

गेल्या पाच वर्षांतील स्थिती

वर्षटीएमसी
20172.86
20183.15
20193.00
20205.81
20217.84
20223.29
बातम्या आणखी आहेत...