आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे कोरोना:पुण्यात आतापर्यंत 56245 रुग्णांनी केली आहे कोरोनावर मात, तर चिंताजनक म्हणजे 760 रुग्ण गंभीर

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. याच काळात पुण्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत आहे. एवढ्या दिवसांनंतर कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत नाही. रोज रुग्णांनी नवनवीन आकडे समोर येत आहेत. शनिवारी पुण्याच नवे १०७३ कोरोना रुग्णांची भर पडली आहे. आता एकूण संख्या ७२,५७६ झाली आहे.

पुण्यात शनिवारी दिवसभरात १०७३ कोरोना रुग्ण आढळले असले तरी दिलासादायक म्हणजे त्यापेक्षा जास्त १,१४५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १४,६२१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण तपासणी आता ३,५४,१०२ झाली असून आज ५,८४० टेस्ट घेण्यात आल्या.

गंभीर कोरोनाबाधितांची संख्या
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या १४ हजार ६२१ रुग्णांपैकी ७६० रुग्ण गंभीर असून यातील ४६६ रुग्ण व्हेंटिलेटरवर तर २९४ रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

एकूण डिस्चार्ज
शनिवारी एकाच दिवसात १,१४५ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. तर पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ५६ हजार २४५ झाली आहे.

शनिवारी झालेल्या टेस्ट
पुणे शहरात शनिवारी एकाच दिवसात ५ हजार ८४० नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता ३ लाख ५४ हजार १०२ इतकी झाली आहे. गंभीर कोरोनाबाधितांची संख्या ७६० आहे.

बातम्या आणखी आहेत...