आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांचा तोडगा:म्हणाले- 15 दिवसांत जुना पूल पाडणार, रस्त्याच्या लेनचे काम त्वरित होणार

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री पुण्यातील चांदणी चौक परिसरातील वाहतूक काेंडीत बराच वेळ अडकून पडले. त्यांच्यामुळेच वाहतूक कोंडी झाल्याचा आरोप करीत नागरिकांनी त्यांना वेढा घालून वाहतूक समस्यांचा पाढा वाचला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आज येथील ब्रिज तोडण्याची गरज आहे. त्यातून वाहतूक कोंडी सोडवता येईल. चांदणी चौकात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मी प्रयत्नशिल आहे. कोर्टात काही इश्श्यू आहेत, याचे निराकरण करण्यासाठी आम्ही युद्ध पातळीवर आम्ही उपाययोजना करीत आहोत असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, मी कलेक्टर, पोलिस आयुक्त, एनएचआयचे अधिकारी यांना सूचना दिल्या. या नंतर सर्व टीम पाहणीसाठी आले. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतुकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील 15 दिवसांत परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरित करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

जूना पूल तोडणार

मुख्यमंत्री म्हणाले, पूल तोडला जाईल त्यासाठी शंभर वाहतूक पोलिस येथे वाहतूक नियमनासाठी असतील. हे काम करणे आमची जबाबदारी आहे. त्यावर आम्ही लक्षक्रेंद्रीत करीत आहोत. उद्यापासून येथे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ तैनात केले जाईल. येथील वाहतूक व्यवस्थेला पर्याय आम्ही देणार आहोत.

हे सरकार लोकांना दिलासा देणारे सरकार आहे. आधी कुणी काय केले ते सोडून द्या आता आपण काम करु, आता सर्वांना आम्ही सूचना दिल्या आहेत. हद्द वैगेरे हा विषय नंतरचा आहे. पोलिसांना आमच्या सूचना आहेत की, एखादी दुर्घटना घडल्यास तत्काळ मदत द्या नंतर उपाय काय करायचे ते बघू. आता यापूढे गोंधळ होणार नाही. मागील काळात गोंधळ झाला. पुण्यात राज्याच्या सत्तासंघर्षावर देखावा तयार केला जात होता त्यावर मी माहिती घेतो असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोकणातील नॅशनल हायवेचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. कोकणात जाताना वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक चाकरमाने पुणे मार्गे जातात त्यामुळे त्याकडेही लक्ष देत आहोत. पुणे जिल्ह्याला लवकरच पालकमंत्री मिळेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री पुण्यातील चांदणी चौक परिसरातील वाहतूक काेंडीत बराच वेळ अडकून पडले. या वेळी नागरिकांनी त्यांना वेढा घालून वाहतूक समस्या सांगितल्या. त्यानंतर त्यांनी या ठिकाणची वाहतूक समस्या सोडवण्याचे आदेश दिले. त्यानुसार पुणे जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी चांदणी चौक परिसराला भेट देऊन वाहतुकीची समस्या, वाहतूक कोंडीची कारणे आणि सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली. पुढील 15 दिवसांत परिसरातील जुना पूल पाडून रस्त्याच्या लेनचे काम त्वरित करण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

9 लेननंतर तीनच लेनमुळे वाहतूक कोंडी

पश्चिमेकडून येणाऱ्या ९ लेनची संख्या चांदणी चौकाजवळ केवळ तीनच होत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होते हे लक्षात घेऊन बैठकीत लेनची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. रस्त्याच्या सुरू असलेल्या कामांना अधिक वेग देण्याचे निर्देश विक्रमकुमार आणि डॉ. देशमुख यांनी दिले. पुणे-बंगळुरू महामार्गावर पुणे व पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांलयाकडून प्रत्येकी 50 असे एकूण 100 मार्शल वाहतूक नियंत्रणासाठी नेमण्यात येतील.

बातम्या आणखी आहेत...