आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश मंडळाच्या प्रमुखांवर कुऱ्हाडीने वार:पुण्यात आजी-माजी पदाधिकाऱ्यातील वादातून घटना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तमनगर परिसरातील अहिरे गेट येथे गणेश मंडळाच्या माजी कार्यकर्त्याने गपणतीची वर्गणी मागण्यावरून झालेल्या वादात प्रमुखावरच हल्ला केला. कुऱ्हाड आणि दगडाने हल्ला करून प्रमुखाला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरूवारी (ता. 1) भिकोबा मोरेनगर येथे रात्री घडली. या प्रकरणी आज (ता. 2) संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली.

या हल्ल्यात चंद्रकांत रामकृष्ण मोरे (वय 44) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी जीवन सुरेश पवार (वय 20) याला अटक केली. तर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

चंद्रकांत मोरे यांचा गणेश मंडळात सहभाग आहे. या मंडळाचा पूर्वी जीवन पवार हा कार्यकर्ता होता. परंतु, यंदा तो मंडळात नाही. दरम्यान, मोरे व कार्यकर्ते हे एका व्यक्तीकडे वर्गणी मागण्यासाठी गेले होते. त्या व्यक्तीने जीवनला सांगितले दोन दिवसांनी वर्गणी देतो म्हणून सांगितले आहे, अशी माहिती दिली. त्यावेळी मोरे यांनी जीवनला बोलवण्याबाबत सांगितले. त्याचदरम्यान, जीवन याचे वडिल तेथे आले. त्यांनी जीवनला कशाला बोलवता तो आता मंडळात नाही, असा प्रश्न मोरे यांना विचारला. त्यावरून मोरे व जीवन यांच्या वडिलांमध्ये शाब्दीक वाद झाले. मोरे यांनी त्यांना अपशब्द वापरले. त्याचा राग जीवनच्या मनात होता. त्यावरून सकाळी दहाच्या सुमारास जीवन व त्याचा अल्पवयीन साथीदार यांनी त्यांच्यावर कुर्हाडीने वारकरून त्यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी येथे धाव घेतली.

पुर्ववैमन्यस्यातून कोयत्याने वार

जुन्या वादातून सराईत गुन्हेगाराने तरुणावर कोयत्याने सपासप वारकरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. दहशत माजवून गाड्यांची तोडफोड केल्याचा प्रकार स्वारगेट परिसरात घडली. याप्रकरणी भक्तिसिंग दुधानी (वय 23, रा. गुलटेकडी) याला अटक केली. तर, शक्तीसिंग दुधानी (वय 27) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तो फरार झाला असून, त्याचा शोध घेतला जात आहे. याबाबत अनिल कांबळे (वय 33) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

भक्तिसिंग दुधानी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दरम्यान तक्रारदार व त्यांच्यात जुने वाद आहेत. दोन दिवसांपुर्वी तक्रारदार हे मित्रांसोबत रात्री आठच्या सुमारास गप्पा मारत बसले होते. यावेळी दोघेजन हातात कोयते घेऊन आले. त्यांनी जुन्या वादातून त्याच्यावर हल्ला केला. मानेवर व हाताच्या पंजावर कोयत्याने वार केले. तर, शक्तीसिंग याने डोक्यात वार केले. यात अनिल गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांनी दहशत माजवत पार्क केलेल्या गाड्यांवर दगड व कोयते मारून नुकसान केले.

बातम्या आणखी आहेत...