आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे काही राहिले नाही:देशात, राज्यात काँग्रेसचे अस्तित्व सकुंचित पावतंय; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याचे स्पष्ट झाले असून, काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार पराभूत झाल्याचे सोमवारी पाहावयास मिळाले. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचे राहिले काय, असा प्रश्न करत राज्यात आणि देशात पक्ष संपत चालला असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेसचे नेते कार्यकर्ते देशात कोणतेही काम करताना दिसत नाही. विधान परिषद निवडणुकीत आमदारांवर अंकुश नसल्याने पराभव झाला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

पुण्यात आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्यानिमित्ताने फुगेवाडी मेट्रो स्थानक येथे मंगळवारी सकाळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे संपर्काबाहेर असल्याच्या प्रश्नावर नारायण राणे यांनी सूचक वक्तव्य केले.

राणे म्हणाले की, ते कुठं आहेत याबाबत असं काही सांगावं लागत नाही. मग त्यांच्या नॉट रिचेबल असण्याला काय अर्थ आहे, असा उलट प्रश्न त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात मोठ्या उत्साहाने योग दिन साजरा केला जात आहे. नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहवे हा उद्देश यामागे आहे. कोरोना काळात नागरिकांची प्रतिकार शक्ती वाढावी या दृष्टीने योगाचे महत्व दिसून आले आहे. योगा दिनाच्या कार्यक्रमानिमित्त देशभरातील 75 ठिकाणी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. पुण्यातील कार्यक्रमात मला सहभागी होता आले, याबद्दल मला आनंद आणि समाधान आहे.