आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमच्या शेठला फार वर्षांनी लेकरु झाले आहे, ते म्हाताऱ्या बायकांना साडया, पैसे माेफत वाटणार आहे असे अमिष दाखवून, ज्येष्ठ नागरिक महिलांना त्यांच्या अंगातील साेने काढून ठेवण्यास सांगुन ते हातचलाखीने लंपास करण्याच्या दाेन घटना पुण्यात सिंहगड राेड व चतुश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहे. या घटनेत दाेन ज्येष्ठ नागरिक महिलांचे सुमारे सव्वादाेन लाख रुपयांचे दागिने लंपास झाल्याची माहिती पोलिसांनी साेमवारी दिली आहे.
पहिल्या घटनेत सुशीला चनबस वैरागकर (वय-85,रा.वडगाव,पुणे) यांनी सिंहगड राेड पोलिस ठाण्यात रविवारी याबाबत दाेन अनाेळखी इसमा विराेधात तक्रार दिली आहे. तक्रारदार वैरागकर या वडगाव परिसरात पाच नाेव्हेंबर राेजी पायी जात असताना, त्यांना एका अनाेळखी इसमाने थांबवले. त्यांना त्याने सांगितले की, माझे शेठला फार दिवसांनी लेकरु झाले आहे, ते महाताऱ्या बायकांना साडया व पैसे वाटणार आहे. असे अमिष दाखवून त्यांना गाेल्डन बेकरी समाेर घेवून जावून तेथे हजर असलेल्या दुसऱ्या आराेपीने संगनमत करुन त्याच्याकडील लाल रंगाचे पिशवीत असलेले पैशांचे बंडल ज्येष्ठ नागरिक महिलेस दाखवून त्यांच्या अंगातील सर्व दागिने त्याच्याकडील लाल रंगाचे पिशवीत ठेवण्यास सांगितले.
महिलेने तशाप्रकारे दागिने काढून पिशवीत ठेवल्यानंतर तिला पैशांचे बंडल मिळतील असे अमिष आराेपींनी दाखवले. परंतु प्रत्यक्षात पैशांचे बंडल ऐवजी बिस्कीटचे पुडे असलेली पिशवी आराेपींनी ठेवून हातचलाखीने महिलेचे एक लाख 90 हजार रुपयांचे 39.5 ग्रॅम वजनाचे साेन्याचे दागिने घेऊन ते पसार झाले आहे.
दुसऱ्या घटनेत पाषाण परिसरातील 79 वर्षीय ताराबाई दिनकर पंडीत या सहा नाेव्हेंबर राेजी राहत्या घरा जवळील परिसरातून पायी जात हाेत्या. त्यावेळी अनाेळखी आराेपीने त्यांना एका बाेळात अडवून आमच्या सेठजीला मुलगा झाला आहे म्हणून ते साडया व लुगडे वाटप करतात. तुम्ही साेबत चला असे आराेपी म्हणाल्यावर, त्या आराेपी साेबत जात नसताना देखील त्याने कपडे फुकट आहेत तर घेऊन टाका असे म्हणून त्यांना साेबत घेऊन जाऊन त्यांचे एक ताेळयाचे 25 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र आराेपीकडे काढून ठेवण्यास भाग पाडून लुगडे घेवून येताे असे सांगुन ताे पसार झाला. याप्रकरणी चतुश्रृंगी पोलिस पुढील तपास करत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.