आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या कहरात अनेक कुटुंबांना एकापेक्षा अधिक सदस्यांना गमावण्याची वेळ आली. सगळ्यांसाठीच मानसिक, आर्थिक, भावनिक या सर्वच पातळ्यांवर हा माेठा धक्का हाेता. त्यातून सावरण्याचा आता हे सारे प्रयत्न करताहेत. काेराेनाने घाला घातलेल्या कुटंुबांच्या या वेदना आणि परिस्थितीला सामाेरे जाण्यासाठी त्यांनी एकवटलेले बळ “दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी जाणून घेतले.
फुलेनगरमधील दाटीवाटीच्या वस्तीत राहणाऱ्या खान कुटुंबीयांवर काेराेनाची वक्रदृष्टी पडली आणि अवघ्या आठवडयाभराच्या कालावधीत घरातील तीन व्यक्ती काेराेनाने दगावल्याने कुटुंब दु:खाच्या खाईत लाेटले गेले. उर्वरित सदस्यांनी एकमेकांना आधार देत पुढील वाटचाल सुरू केली असली तरी घरातील प्रमुख व्यक्तीच गमावल्यंाने उद्भवलेल्या आर्थिक संकटातून हे कुटुंब मार्ग शोधत आहे. ६८ वर्षीय इनायतउल्ला माजिद खान हे ५५ वर्षीय पत्नी अमिना, दाेन मुले व त्यांच्या कुटुंबीयांसमवेत गुण्यागाेविंदाने राहत हाेते. मात्र, आॅगस्ट महिना त्यांच्या आनंदावर विरजण घालणारा ठरला. सातजण काेराेना बाधित झाले. इनायतउल्ला खान यांना व्हेंटिलेटरच मिळाले नाही. बाकीचे सारे हाेम क्वारंटाइनमध्ये हाेते. परंतु बेचाळीस वर्षीय रौफला तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यांची पत्नी तरुन्नम व एक मुलगा यांच्यावर घरीच उपचार सुरू होते.
राैफ यांचा धाकटा भाऊ सादिक हाच सुरक्षित राहिला होता. त्यानेे आटोकाट प्रयत्न केले, पण वयस्कर आई-वडील आणि उमेदीतील भावाला तो वाचवू शकला नाही. प्रथम वडील गेले. त्यांच्या धक्क्याने आई. नंतर सात दिवस अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंजणाऱ्या मोठ्या भावाने प्राण सोडले. बाकीचे चाैघे बरे झाले. मात्र तिघांच्या मृत्यूचा धक्का व नैराश्यातून बाहेर पडणे मुश्कील झाले होते. उपचारांसाठी झालेला खर्च आणि घरातील कर्त्यांच्या मृत्यूमुळेे संकट तीव्र झालेले. आरटीओ एजंट म्हणून काम करणाऱ्या सादिकवर संपूर्ण कुटुंबाचा भार आला. शेवटी आपल्या कामासोबत भावाची रिक्षा चालवणे आणि भाजी विकणे अशी तिहेरी कसरत करीत त्याने कुटुंबास आधार दिला. वहिनी आणि पुतण्यांची जबाबदारी स्वीकारली. कुटुंबीयांना या दु:खातून बाहेर काढण्यासोबतच आर्थिक अडचणींचा सामना करण्याची कसरत तो पार पाडतोय. अर्थात गमावलेल्या तिघांची पोकळी भरून निघणारी नसल्याचे सादिक सांगतो.
कर्त्यांच्या मृत्यूमुळेे संकट तीव्र झालेले. आरटीओ एजंट म्हणून काम करणाऱ्या सादिकवर संपूर्ण कुटुंबाचा भार आला. शेवटी आपल्या कामासोबत भावाची रिक्षा चालवणे आणि भाजी विकणे अशी तिहेरी कसरत करीत त्याने कुटुंबास आधार दिला. वहिनी आणि पुतण्यांची जबाबदारी स्वीकारली. कुटुंबीयांना या दु:खातून बाहेर काढण्यासोबतच आर्थिक अडचणींचा सामना करण्याची कसरत तो पार पाडतोय. अर्थात गमावलेल्या तिघांची पोकळी भरून निघणारी नसल्याचे सादिक सांगतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.