आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यात रायटिंग वंडर्स’तर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय पेन महोत्सवाचे रंजन यांच्या हस्ते शनिवारी (10 डिसेंबरला) उद्घाटन झाले. तसेच महोत्सवात पाच लाखांचा ‘मोन्टेग्राप्पा बॅटमॅन एडिशन’ पेन पाहण्याची संधी पेन चाहत्यांना मिळाली. याप्रसंगी पटना, बिहार येथील पेन संग्राहक युसुफ मन्सूर, पेनचे चाहते आणि वास्तुविशारद यशवंत पिटकर, व्हीनस ट्रेडर्स’चे सुरेंद्र करमचंदानी हे उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते माजी राष्ट्रपती भारतरत्न ‘डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम सिग्नेचर फाउंटन पेन’चे अनावरण करण्यात आले. या पेनचे वैशिष्ट्य म्हणजे या पेनाच्या टोपणावर भारतरत्न डॉ. ए. पी.जे अब्दुल कलाम यांची अधिकृत स्वाक्षरी कोरलेली आहे. तसेच त्यांचे देशाप्रती असलेले प्रेम लक्षात घेत, पेन’च्या नीबवर ‘आय लव्ह इंडिया’ असे लिहिण्यात आले.
भारत देश स्वतःमध्येच जगातील एक मोठी बाजारपेठ आहे. त्याचबरोबर भारताकडून सध्या जगात सर्वात जास्त पेन रिफिल आणि प्लास्टिक पेनची निर्यात केली जात आहे. या क्षेत्रात चीनला पर्याय म्हणून भारताकडे पाहिले जात आहे.
प्लास्टिक पेन उत्पादनात भारताकडे चीनला मागे टाकण्याची क्षमता असून, आगामी काळात निश्चितच या क्षेत्रातील व्यापारात विस्तार होईल, असा विश्वास विलियम पेन’चे व्यवस्थापकीय संचालक निखील रंजन यांनी व्यक्त केला. रंजन यांच्या विलियम पेन कंपनीने नुकतेच अमेरिकेतील 110 वर्षे जुनी शेफर पेन ही प्रसिद्ध पेन कंपनी संपादित केली आहे.
सेनापती बापट रस्ता येथील हॉटेल जे. डब्ल्यू मेरीएट येथे आयोजित या पेन महोत्सवासाठी प्रवेश विनामूल्य असून, महोत्सवाची वेळ रविवारी, 11 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते रात्री 8 असणार आहे. महोत्सवात पेनाच्या चाहत्यांना जगभरातील तब्बल 70 हून अधिक ब्रँड’चे विविध प्रकारातील ‘प्रीमयम’ पेन पाहता येणार.
रंजन म्हणाले, पेन उद्योगाचा शिक्षण क्षेत्राशी अगदी जवळचा संबंध आहे. भारतात शिक्षण घेणाऱ्या तरुण वर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्याचबरोबर भेटवस्तू म्हणून पेन’ला सर्वाधिक पसंती दिली जाते. तर पेनांचा संग्रह करणारे अनेक चाहते आपल्याकडे आहेत. त्यामुळेच पेन उद्योगासाठी भारत एक मोठी बाजारपेठ ठरत आहे. तसेच अलीकडील काळात भारताच्या निर्यात क्षमतेतही मोठ्या प्रमाणात वाढ झालीये आहे.
या पेनचे वैशिष्ट्य म्हणजे टीटानियम धातूपासून हा पेन बनविण्यात आला असून, याला सोन्याची नीब बसविण्यात आली आहे. बॅटमॅन या लोकप्रिय भूमिकेपासून प्रेरित होत, या पेनाचे डिझाईन करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्टेक्स कंपनीतर्फे तयार करण्यात आलेला मुघल कला आणि वास्तुशास्त्रावर आधारित ‘ अष्टकोन’ हा 22 कॅरट सोन्याचा मुलामा असलेला पेन आणि शाई बॉटल देखील महोत्सवात पाहता येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.