आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविश्रांतवाडी परिसरात दहशत माजविणार्या सराईत राज भवार टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे. टोळीविरूद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, पोलिसांचे आदेशाचा भंग करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे अशा स्वरुपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मोक्कानुसार केलेली ही 111 वी कारवाई आहे.
राज रवींद्र भवार (वय - 24 टोळी प्रमुख) , जयेश उमेश भोसले (वय -19 रा. धानोरी रोड विश्रांतवाडी )सुमित सुभाष साळवे (वय -19 रा. रामवाडी) गौरव सुनिल कदम (वय 22 )रा. धानोरी रोड विश्रांतवाडी) अकबर आयुब शेख (वय 21) रा. वडारवस्ती विश्रांतवाडी यांच्यासह तीनल अल्पवयीनांविरूद्ध मोक्का कारवाई करण्यात आली आहे.
अनेक गुन्हे दाखल
सराईत राज भवार याने विश्रांतवाडी ,येरवडा ,विमानतळ परिसरात दहशत माजविली होती. टोळीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, पोलिसांचे आदेशाचा भंग करण्याचे गंभीर गुन्हे केले आहेत. टोळीविरूद्ध मोक्कानुसार कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी एसीपी आरती बनसोडे, उपायुक्त शशिकांत बोराटे, अपर आयुक्त नामदेव चव्हाण यांच्यावतीने सादर केला. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी भवार टोळीविरूद्ध मोक्का कारवाई केली. गुन्ह्याचा तपास एसीपी आरती बनसोडे करीत आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय भापकर,पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, उपनिरीक्षक शुभांगी मगदुम, मनोज शिंदे, सुनिल हसबे यांनी केली.
17 लाखांचा गुटखा जप्त
कोंढव्यातील शिवनेरी नगर येथे अवैधरित्या तंबाखु, सुपारी विक्री करता बाळगल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून तब्बल 17 लाखांचा अवैध माल जप्त केला. याप्रकरणी एकावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरीफ वाहीद अन्सारी (37, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द,पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी खेमा लक्ष्मण सोनकांबळे (45) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुधवारी कारवाई केली. यावेळी 17 लाखांचा तंबाखुजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.