आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात हल्ल्यांच्या घटना वाढल्या:तीक्ष्ण शस्त्राने बाप-लेकावर हल्ला; कोंढवा, खराडीतही तरुणांवर हल्ला

पुणे22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ कारणावरून तीक्ष्ण शस्त्राने बाप-लेकावर हल्ला गळ्याच्या भोवती भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पुण्यात घडली असून यात मुलगा गंभीर जखमी झाला, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी एकाला अटक केली.

वानवडी पोलिस ठाण्यात अफरोज अहेमद लालसाब पीरजादे (वय 34) यांनी तक्रार दिली आहे. यानुसार, पोलिसांनी कदीर पठाण याला अटक केली आहे. तक्रारदार व संशयित आरोपी ओळखीचे आहेत. दोन दिवसांपुर्वी सकाळी साडे आकरच्या सुमारास अफरोज हे त्यांच्या हॉटेलवर काही साहित्य घेऊन जात होते. यावेळी रस्त्याच्या कडेला उभारलेल्या कादीरने त्यांना शिवीगाळ केली. तर, त्यांच्या मागे-मागे हॉटेलवर जात तेथे त्यांना व वडिलांना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यानंतर तो निघून गेला. पण, परत पुन्हा शस्त्र घेऊन आला. त्याने तक्रारदारावर हल्ला करत त्यांच्या गळ्याभोवती तीक्ष्ण शस्त्र भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

टोळक्याकडून तरुणावर हल्ला

दुसऱ्या घटनेत दोन तरुणांवर टोळक्याने हल्ला करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना खराडी परिसरात घडली. तर, त्याच्या कारची तोडफोडकरून परिसरत दहशतही पसरवली.

याप्रकरणी अनिकेत महादेव मुंडे (वय 19) व अमोल महादेव मुंडे (वय 22) यांना अटक केली आहे. तर, त्यांच्या इतर सात साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत आदर्श संजय कदम (वय 23) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आदर्श व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. त्यांच्यात जुने वाद आहेत. दोन दिवसांपुर्वी खराडी येथील सिटी विस्टा परिसरात आदर्श हा कारने जात होता. त्यावेळी आरोपींनी त्याला खुन्नस देऊन का पाहतो, अशी विचारणा केली व त्याच्या कारमध्ये डोकाऊन पाहिले. त्यामुळे आदर्शने काय पाहता अशी विचारणा केली असता टोळक्याने त्याच्यावर हल्ला केला असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

मोबाईलवरून चाकूहल्ला

मोबाईल न विचारता घेऊन गेल्याबाबत विचारणा केल्याच्या रागातून चुलत भावाने लहान भावावर चाकूने हल्ला केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात रवि उमाप (वय 30) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत गणेश उमाप (वय 22) यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. गणेश व रवि हे चुलत भाऊ आहेत. रवि हा गणेश याचा मोबाईलसोबत घेऊन गेला होता. त्याबाबत गणेशने विचारणा केली. त्यावेळी रविने तुला मोबाईल पाहिजे का, असे म्हणत लाथा-बुक्यांनी मारहाण करत चाकूने हल्ला केला.

बातम्या आणखी आहेत...