आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Incidents Of Theft Even During Ganeshotsav An Inter state Gang Of Women Who Stole Mobile Phones In Dagdusheth Ganapati Area Was Arrested

गणेशोत्सवातही चोरीच्या घटना:दगडूशेठ गणपती परिसरात मोबाइल चोरी करणारी आंतरराज्य महिला टोळी अटकेत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील नामांकित श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिलेचा मोबाइल चोरणाऱ्या कर्नाटकातील चार महिला चोरट्यांना गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली असून विश्रामबाग पोलिसांकडे त्यांचा ताबा देण्यात आला आहे अशी माहिती सोमवारी देण्यात आली आहे. ही घटना तीन सप्टेंबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

आगराम्मा गिडी आणा गुंजा (वय 35 वर्षे रा. सिद्धपुरम करनूल, आंध्रप्रदेश), आमुल्ला अलाप्रभाकर कंप्यरिलामा, (वय 30 वर्ष रा. अमागड, दमाचार, नलूर, आंध्रप्रदेश), अनिता पिटला सुधाकर (25 वर्षे, रा. सिद्धपुरम, करनुत प्रदेश), सुशिला इसाम संपीडी, (वय 35 वर्षे रा. सिद्धपुरम करनूल, आंध्र प्रदेश) अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या महिला आरोपींची नावे आहे. फिर्यादी तरूणी ३ सप्टेंबरला दगडूशेठ हलवाई गणपती पाहण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चार महिला चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील 40 हजारांचा मोबाइल चोरला. त्यावेळी मोबाइल चोरणाऱ्या महिला दिसून येताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार विश्रामबाग पोलिसांनी चार महिला चोरट्यांना ताब्यात घेत अटक केली. याबाबत गुन्हे शाखा युनिट एक पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप भोसले म्हणाले, संबंधित आरोपी महिला या विविध ठिकाणी चोरीचे गुन्हे करत असल्याचे निष्पन्न झाले असून यापूर्वी त्यांच्यावर महाराष्ट्रात चंद्रपूर आणि मुंबई या ठिकाणी आठ ते दहा गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या ताब्यातून चोरीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहे. सदर महिलांना तेलुगु भाषा येत असल्याने भाषेच्या संदर्भात चौकशी दरम्यान काहीशी अडचणी निर्माण होत आहेत. याबाबत पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहे.

दर्शन रांगेत जेष्ठाची रोकड चोरीला

दगडूशेठ हलवाई गणपती मंडपात दर्शनाच्या रांगेत उभा राहिलेल्या जेष्ठ नागरिकाच्या खिशातून दोन हजारांची रोकड चोरणाऱ्या चोरट्याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली. ही घटना चार सप्टेंबरला दुपारी दीडच्या सुमारास घडली.संदीप सुनील बोरसे (वय 27 रा. खरदे, शिरपूर, धुळे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विलास निकाळजे (वय 70 रा. भुमकर मळा,पुणे) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अमलदार एस गोंजारी याबाबत पुढील तपास करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...