आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज सात वर्षे पूर्ण होत आहेत. हत्येनंतर ९ महिने पोलिसांनी तपासाची हेळसांड केल्यानंतर तपास सीबीआयकडे वर्ग झाला, परंतु सीबीआयकडूनही तपास पूर्ण झालेला नाही. ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याची खंत डॉ. हमीद दाभोलकर यांनी व्यक्त केली.
डॉ. हमीद म्हणाले, डॉ. दाभोलकरांच्या हत्येतील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने २०१६ मध्ये डॉ. वीरेंद्र तावडेला अटक केली. ऑगस्ट २०१८ मध्ये शरद कळसकर, सचिन अंदुरे, तर मे २०१९ मध्ये अॅड. संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांना अटक करून आरोपपत्र दाखल केले. मात्र, संशयित आरोपी असलेल्या अमोल काळेवर अद्यापही आरोपपत्र दाखल केलेले नाही. येथेच तपास येऊन थांबला असून खुनामागील सूत्रधार कोण आहे हे सीबीआयने शोधून काढले पाहीजे.
डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश या चारही हत्यांमधील धागेदोरे तपास यंत्रणांनी उकलले आहेत. त्यातील संशयित आरोपीही समान आहेत. तसेच न्यायवैद्यक शाळेच्या अहवालानुसार डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्यावर एकाच पिस्तुलातून गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. सीबीआयने पुरवणी आरोपपत्रामध्ये कॉ. पानसरे, प्रा. कुलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येशी असलेला संबंध रेकॉर्डवर आला आहे. त्यातून ही घटना केवळ हत्या नसून दहशतवादी कृत्य असल्याचे सीबीआयचे म्हणणे आहे. त्यानुसार बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा यात लावण्यात आला असल्याचे ते म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.