आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात फसवणुकीच्या घटनात वाढ:गुंतवणुकीच्या अमिषाने साडेअकरा लाख रुपयांना गंडा; दोघांविरोधात गुन्हा दाखल

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमाननगर परिसरात राहणाऱ्या अनिल कुमार रविकांत गाेयल (वय-55) यांचा दाेनजणांनी विश्वास संपादन करुन त्यांना गुंतवणुक केल्यास, दरमहिना 6 ते 8 टक्के महिना परतावा मिळेल, असे आश्वासन देऊन त्यांची 11 लाख 62 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी दाेन आराेपींवर विमानतळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

मिलिंद बाळासाे गाढवे (रा.सांगली) व अजय जगदेव इंगळे (रा.निगडी,पुणे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहे. सदरचा प्रकार स्पटेंबर 2021 ते जानेवारी 2022 यादरम्यान घडलेला आहे. संबंधित दाेन आराेपींनी तक्रारदार अनिलकुमार गाेयल यांच्याशी ओळख करुन त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांना गुंतवणुक केलेल्या रकमेवर 6 ते 8 टक्के महिना परतावा देण्याचे खाेटे आश्वासन त्यांनी देऊन गुंतवणुक करण्यास भाग पाडले. त्यानुसार एस.एम.ग्लाेबल कंपनीचे मेटा ट्रेडर (एम.टी.5) हे फाॅरेक्स ट्रेडिंग या बनावट ट्रेडिंग अॅपद्वारे 11 लाख 62 हजार रुपये घेवून त्याचा अॅक्सेस स्वत:कडे ठेवून त्यांची फसवणुक केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास विमानतळ पोलिस करत आहे.

बांधकाम साईटवर चोरी करणारा अटकेत

इमारतीच्या बांधकामावेळी वापरण्यात येणारे लोखंडी बार आणि रिंगा चोरून नेणाऱ्याला चंदननगर पोलिसांनी अटक केली. त्याने 1 लाख 64 हजारांचे ऐवज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे.कृष्णा बबन वाघमारे (वय 35 रा. चंदननगर,पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाळू धिवार (वय 56 ) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे . खराडी परिसरात बांधकाम सुरू असून त्याठिकाणी बाळू हे समन्वयक आहेत. 23 ते 26 ऑक्टोबर काळात चोरट्यांनी सुरक्षारक्षकाचे लक्ष नसताना 1 लाख 64 हजारांचे लोखंडी साहित्य चोरून नेले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी कृष्णा वाघमारे याला अटक केली आहे. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, उपनिरीक्षक अरविंद कुमरे यांच्या पथकाने केली.

बातम्या आणखी आहेत...