आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:विस्थापित काश्मिरी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी जागा वाढवू : मंत्री सामंत

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काश्मिरी पंडितांच्या विस्थापित झालेल्या मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी प्राधान्याने प्रवेश देण्यात येतील. प्रसंगी प्रवेशाच्या जागा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

काश्मीर खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या घटना वाढत आहेत. गेल्या दोन महिन्यांत काश्मिरी पंडितांची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या मुलांंना महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्राधान्याने प्रवेश देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत, असे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील सर्व कुलगुरूंनी परीक्षा ऑफलाइन घेण्याची सूचना केल्याचे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...