आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१८ मे १९७४ ला भारताने पोखरणमध्ये आपली पहिली आण्विक चाचणी केली. त्यानंतर भारताने आण्विक क्षेत्रात पूर्णपणे आत्मनिर्भर होण्याचे प्रयत्न सुरू केले आणि ११ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये ३ आण्विक चाचणी घेतल्या. याच वर्षी भारताकडून एकूण ५ चाचण्या घेण्यात आल्या. या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली. भारताने आण्विक क्षेत्रातच नव्हे तर सामरिक क्षेत्रातही लांब पल्ल्याचा प्रवास केला आहे. या तयारीत महत्त्वाची जबाबदारी निभावणारे महान संशोधक डॉ. अनिल काकोडकरांशी हा संवाद...
अणुचाचणी करून भारताने कोणतीही आक्रमकता दाखवलेली नाही : काकोडकर
अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर म्हणाले, बदलती जागतिक समिकरणे, भारतीय उपखंडातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता नजीकच्या भविष्यात अणु उर्जेसाठी त्याचा वापर अपरिहार्य ठरणार आहे. डॉ. काकोडकर म्हणाले, ‘आपण १९७४ मध्ये प्रथम अणुचाचणीस्फोट केला, तेव्हा तत्कालीन विकसित जग आश्चर्यचकित झाले होते. बड्या देशांना तर ही कृती अजिबात रुचली नाही आणि त्यांनी तात्काळ आपल्यावर निर्बंध घातले होते. विकसनशील देशाने थेट अणुचाचणीस्फोट करण्याची क्षमता मिळवावी, हे अनेक देशांना खटकले. पण खंबीर राजकीय नेतृत्वाने ठाम भूमिका घेत अणुचाचणीचे समर्थन केले.
त्यानंतर आपण पोखरणला पुन्हा अणुचाचणीस्फोट केले. तेव्हाही गदारोळ झाला, पण १९९८ नंतरची परिस्थिती बदललेली होती. अधिक संवेदनशील झाली होती. जागतिक पातळीवर सीटीबीटी चार्ट तयार झाला होता. आपण ‘न्यूक्लिअर वेपन स्टेट’ आहोत, हे जाहीर करणे अपरिहार्य झाले होते. या प्रत्येक वेळी आपण देश म्हणून अत्यंत जबाबदारीची भूमिका निभावली आहे. कुठल्याही कराराचा आपण भंग केला नाही. किंवा अटींचे उल्लंघनही केले नाही. आपण आंतरराष्ट्रीय समुदायात स्वसंरक्षणासाठी अणुचाचणीस्फोटांची क्षमता सिद्ध करून दाखवली. कोणत्याही प्रकारची आक्रमकता आपण दाखवली नाही. तो आपला उद्देश नाही. पण प्रसंग पडलाच, तर आपण सक्षम आहोत, हा संदेश जागतिक पातळीवर पोचणे आवश्यक होते आणि ते यातून शक्य झाले, हे महत्त्वाचे आहे.’.
अत्याधुनिक रिअॅक्टर आपण विकसित केले. देशाकडे युरेनिअमचा पुरेसा साठा आणि पुरवठाही आहे. निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यावरचे तंत्रज्ञानही उपलब्ध असून कुशल मनुष्यबळाची याला चांगली जोड आहे. अणुउर्जा विकसित करणे अवघड जाते कारण सद्यस्थितीत ते सर्वांत संवेदनशील तंत्रज्ञान समजले जाते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.