आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऑटाेमाेबाइल उद्याेगाची देशातील आर्थिक उलाढाल ही 7.5 लाख काेटी रुपये आहे. निर्यात 3.5 लाख काेटी रुपये आहे. जीडीपी मध्ये 7.5 टक्के वाटा तर उत्पादनात 49 टक्के वाटा असून साडेचार काेटी लाेकांना राेजगार देण्यात आला आहे. भारतीय ऑटाेमाेबाइल इंडस्ट्री 2025 समाप्तीपर्यंत जगातील एक क्रमांकाचा ऑटाेमाेबाइल उत्पादन हब हाेईल. जगात सर्वाधिक निर्यातदार देश आपण हाेऊ, असे मत केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले. ते चाकण येथील सेई इंडिया कंपनीच्या सिलव्हर ज्युबली कार्यक्रमात बाेलत हाेते. यावेळी सेई इंडियाचे अध्यक्षा रश्मी उत्पदेशी, महिंद्रा कंपनीचे माजी मॅनेजिंग डायरेक्टर पवन गाेयंका, फियाट इंडिया अध्यक्ष रवी गाेबिया उपस्थित हाेते.
फायदा भविष्यात होणार
गडकरी म्हणाले की, जगातील बुध्दिमान तरुण मनुष्यबळ आपल्याकडे उपलब्ध आहे. स्टार्टअप ही माेठया प्रमाणात वाढत आहे. 15 लाख काेटीची ऑटाेमाेबाइल क्षेत्राची उलाढाल 2025 पर्यंत वाढेल आणि दाेन ते अडीच काेटी नवीन राेजगार निर्मिती हाेईल. केंद्र व राज्यसरकारला सर्वाधिक जीएसटी देणारा हा उद्याेग आहे. सेमीकंडक्टर ही देशात निर्मितीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मध्यंतरी देशात सेमीकंडक्टरची कमतरता जाणवत हाेती. अडचणी सर्व क्षेत्रात येत असतात परंतु समस्यांचे संधीत रुपांतर केले पाहिजे. युराे-6 ची वाहने निर्मिती वाढल्यावर आपली निर्यात जगात वाढलेली आहे. देशातील गरजा लक्षात घेऊन इंधनापासून वाहन निर्मिती पर्यंत संशाेधन केल्यास त्याचा फायदा भविष्यात हाेऊ शकेल. देशात इंधानमुळे प्रदूषणाचा प्रश्न, आर्थिक समस्या निर्माण झाल्या आहे. यासमस्यावर उत्तरे आपण शाेधली पाहिजे. इथेनाॅल, मिथेनाॅलची गरज वाढत असून अद्यावत इंधनावर काम केले पाहिजे. स्वदेशी, स्वावलंब आपण म्हणताे त्यावेळी ते प्रत्यक्षात येणे आनंददायी बाब आहे.
आपल्या गाड्यांची दुरवस्था
गडकरी यांनी सांगितले की, ज्यावेळी मी विद्यार्थी हाेताे तेव्हा मारुतीचे सुझुकीत विलीनीकरण भारत सरकारने केले हाेते. त्याविराेधात मी चळवळीत असल्याने आंदाेलन केले हाेते. हे का हाेते? याविराेधात भूमिका मांडली हाेती. देशातील ऑटाेमाेबाइल इंडस्ट्री अद्यावत हाेऊन वाहने चांगली बनू लागली हे मला नंतर समजले. कधीकाळी आपल्या गाडया अशा हाेत्या की हाॅर्न साेडून सर्व वाजत हाेते. परंतु तंत्रज्ञानाचा माेठा बदल झाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत इंधन, अन्नधान्य व खत या तीन गाेष्टींची खूप चर्चा हाेते. रशिया व युक्रेन युध्दानंतर संबंधित गाेष्टीवर परिणाम झाल्याचे पहावयास मिळते. संशाेधन हे गरजू लाेकांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आले पाहिजे. आत्मनिर्भर भारताची दूरदृष्टी ठेवली तर देश आगामी काळात प्रगती करू शकेल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.