आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Indian Economy Will Remain Balanced, 'inflation' Under Control; Former Union Minister Of State For Finance MP Jayant Sinha Expressed His Opinion

भारतीय अर्थव्यवस्था संतुलित:‘महागाई’ नियंत्रणात राहील; माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केले मत

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना, रशिया-युक्रेनचे युद्ध, वाढती महागाई, चीनमधील ताळेबंदी अशा जागतिक महासंकटात अमेरिका, चीनसह युरोपीय देशांची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असताना भारतीय अर्थव्यवस्था संतुलित, स्थिरता देणारी, गतीमान, महागाईचा दर कमी करणारी आणि उच्च दर्जाच्या रोजगारांच्या संधी निर्माण करून देणारी असल्याचा विश्वास मत माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी शनिवारी व्यक्त केला.

बीजेपी इन्फ्रास्क्चर आणि बीजेपी बीझनेस सेल यांच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्प 2023 या विषयावरील चर्चा सत्रानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत सिन्हा बोलत होते. शहर भाजपचे संघटन चिटणीस, दीपक नागरपूरे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

सिन्हा पुढे म्हणाले, सध्या भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पनाच्या (जीडीपी)सात टक्के इतका आहे. जागतिक मंदीचे संकट लक्षात घेवून, पुढील सहा महिन्यांत तो साडे सहा टक्क्यांवर येईल असा अंदाज व्यक्त केला जातो. मात्र वेगाने वाढत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करता हा दर आठपर्यंतही जाऊ शकतो. अमृत काळातील हा अर्थसंकल्प देशाला स्थैर्य देणारा आहे. शिक्षण, संशोधन, विज्ञान, आरोग्य आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांसाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कराचे सुलभीकरण करण्यात आले आहे. प्राप्तीकर आकारण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कर प्रणालीचा नागरिकांना फायदा होणार आहे. महागाईचा दर कमी करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असून सहा ते सात टक्के महागाईचा असलेला दर सध्या पाच टक्क्यांवर आलेला आहे.

त्यामुळे भाव स्थिर होत असल्याचेही दिसून येत आहे. यंदाचा अर्थसंकल्प सर्व घटकांसाठी संतुलित आणि देशाला प्रगतिपथावर नेणारा आहे. शेती, सहकार, वंचित, शोषित, आदिवासी, युवक, लघु व मध्यम उद्योग, हरित विकास, आर्थिक क्षेत्र, रेल्वे महामार्गासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर असून ती तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी ही केंद्र सरकार प्राधान्याने प्रयत्न करत आहे. त्यासाठी आरोग्य, शिक्षण, संशोधन आणि तंत्रज्ञान यावर भर दिला जात आहे आणि त्यामध्ये गुंतवणूक वाढवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...