आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोशिहिरो कानेको यांचे मत:जपानच्या शैक्षणिक संधीचा भारतीय फायदा घेत नाहीत

पुणे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत आणि जपान हे दोन्ही प्राचीन देश गेल्या काही शतकांपासून एकमेकांशी जोडले गेले आहेत. औद्योगिक व ऑटोमोबाइल क्षेत्रातदेखील ते पूरक काम करत आहेत. शैक्षणिकदृष्ट्या उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी जपान ही आज जगाची पसंती असताना येथे शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या मात्र केवळ १,४५७ इतकी नगण्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जपानमधील शैक्षणिक संधींचा फायदा घ्यावा, अशी अपेक्षा कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबईचे मुख्य काैन्सिल तोशिहिरो कानेको यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. पुण्यातील इंडो जपान बिझनेस काौन्सिल अर्थात आयजेबीसी आणि जपान सरकारचे कॉन्सुलेट जनरल ऑफ जपान इन मुंबई यांच्या वतीने आयोजित पहिल्या भारत-जपान शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन तोशिहिरो कानेको यांच्या हस्ते झाले त्या वेळी ते बोलत होते. एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, फुजित्सूच्या लीड फॉर मॅनेजमेंट अँड लीडरशिप डेव्हलपमेंट विभागाच्या विनया वैद्य, जपानमधील कियो विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. राजीब शॉ, टोकियो विद्यापीठाचे प्रतिनिधी कजुनोरी ससाकी, आयजेबीसीचे अध्यक्ष सिद्धार्थ देशमुख, उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, संस्थेच्या उच्च शिक्षण संशोधन प्रकल्पाचे अध्यक्ष सुधीर जैस्वाल आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. मिलिंद पांडे यांनी भारत व जपानमधील शैक्षणिक संबंध आणखी घनिष्ट व्हावेत यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत नजीकच्या भविष्यात एमआयटी यासाठी प्रयत्नशील असेल अशी ग्वाही दिली. शिवाय भारत-जपान हे माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमोबाइल्स, स्टार्टअप्स, इन्क्युबेशन, अ‍ॅक्सिलरेशन आदी क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी पार पाडू शकतील असा विश्वासदेखील व्यक्त केला.सुधीर जैस्वाल यांनी प्रास्ताविक केले, तर अभिषेक चौधरी यांनी आभार मानले.

जपानमध्ये शैक्षणिक खर्च कमी; भारत-जपान शैक्षणिक संबंध दृढ होणे गरजेचे जपानमध्ये ८०७ विद्यापीठे, ३०९ ज्युनियर महाविद्यालये, ५७ तांत्रिक विद्यालये, तर तब्बल ३,०४९ विशेष प्रशिक्षण देणारी विद्यालये आहेत. शिवाय २०२३ च्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमधील १,००० विद्यापीठांमध्ये जपानमधील तब्बल ३८ विद्यापीठांचा समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये अनेक उच्च शैक्षणिक संधी उपलब्ध आहेत म्हणूनच नजीकच्या भविष्यात भारत-जपान शैक्षणिक संबंध दृढ होणे काळाची गरज आहे, असेही कानेको म्हणाले. अन्य देशांच्या तुलनेत जपानमध्ये शैक्षणिक खर्चही कमी आहे.

बातम्या आणखी आहेत...