आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांची पत्र परिषद:म्हणाले -जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष; जनता सुजाण असून, नेते चुकल्यावर धडा शिकवते

पुरंदर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील जनतेच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष असून, देशावर आर्थिक संकट आले आहे. मात्र, देशातील जनता सुजाण असून, नेते चुकल्यावर त्यांना चांगलाच धडा शिकवते, असे म्हणत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. पवार सध्या पुरंदरच्या दौऱ्यावर असून, तेथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुरंदर किल्ल्याकडे राज्य सरकारने लक्ष द्यायले हवे, जगण्याला आम्ही कोणताही सलोखा देऊ शकतो, असे म्हणत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांची राज्य सरकारला विनंती केली.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी जवाहर राठोड यांच्या कवितेचे वाचन केले होते, त्यानंतर राज्यात त्यांच्यावर टीका केली जात होती. त्यामुळे पवारांनी पुन्हा एकदा जवाहर राठोड यांच्या कवितेचे वाचन करुन दाखवले. कष्टकरांच्या वेदना मांडण्याचा राठोड यांनी प्रयत्न केला आहे. ज्यांना टीका करायची त्यांना टीका करू द्या, अशी प्रतिक्रिया पवारांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ही आपली जमेची बाजू आहे. बाबासाहेबांच्या घटनेमुळे देश एकसंघ आहे, असेही पवार म्हणाले.

जनता धडा शिकवते

पुढे शरद पवारांनी श्रीलंकेवर आलेल्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले. ते म्हणाले की, श्रीलंकेता आर्थिक संकट निर्माण झाले असून, भारतात आणीबाणीनंतर जनतेने इंदिरा गांधींचे सरकार पाडले होते. त्यानंतर पुन्हा मोरारजींचे सरकार देखील पडले होते. जनता सुजाण आहे, नेते चुकल्यावर त्यांना धडा शिकवते, लोकांच्या प्रश्नाकडे सरकारचे दुर्लक्ष आहे, असे म्हणत पवारांनी केंद्र सरकारवर टीका केली.

पुरंदर विमानतळाची गरज

पुरंदरचा विमानतळात उपयुक्त असून, तो पूर्ण व्हावा. पुणे आणि साताऱ्यासाठी पुरंदरचा विमानतळ होणे अतिशय गरजेचे आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

साताऱ्याच्या एका सभेत शरद पवार म्हणाले होते की, हल्लीच्या काळात समाजाच्या लहान घटकांवर अन्याय झाला, असे अनेक लोकं आपल्या कामाने पुढे येत आहेत. मी औरंगाबादला जातो तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काढलेल्या मिलिंद कॉलेजमध्ये उपेक्षित समाजातील मुले-मुली शिकायची. शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना या कुटुंबातील मुले उत्तम लिखाण करायची. जवाहर राठोड नावाचा एक कवी होता तो हयात नाही. पंरतु त्याने लिहलेली कविता मला आठवते, त्या कवितेचे नाव पाथरवट असे होते.

या कवितेत तो म्हणाला होता की, तुमचा दगड घोंडा आम्ही धन्नी आणि हातोड्याने फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला, पिठ तयार करायला जे लागतं ते आम्ही घडवतो. ज्या जात्यातून पिठ निघतं त्याने तुमचे पोट भरते. आज आम्ही अनेक गोष्टी घडवल्या. आमच्या छनीने, हातोड्याने आणि घामाने, तुम्ही ज्यांची पूजा करता त्यां ब्रम्हा, विष्णू महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो, तुम्ही आम्हाला त्या मंदिरात येऊ देत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, ब्रम्हा, विष्णू आणि महेश आम्ही आमच्या हाताने घडवला. हा तुमचा देवा देव, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही, असे काव्य जवाहरने लिहून ठेवल्याचे शरद पवारांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...