आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगमंत्री उदय सामंत यांची ग्वाही:‘उद्योग धोरणात बदल करण्यासाठी उद्योगकांच्या सूचना घेऊ’

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात अग्रस्थानावर आणायचे असून त्यासाठी औद्योगिक धोरणांमध्ये बदल करण्याची आवश्यकता असल्यास उद्योगांकडून सूचना घेऊन धोरण बदलासाठी निश्चित प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी येथे दिली.

राज्य शासन उद्योगांच्या खंबीरपणे पाठीशी असून उद्योगांच्या वाढीसाठी सर्व सोयी सुविधा पुरवल्या जातील, असेही ते म्हणाले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या (एमसीसीआयए) विद्यमाने पिंपरी-चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये आयोजित ‘पुणे मॅन्युफॅक्चरिंग एक्स्पो २०२२- पुणे डीफटेक’ प्रदर्शनाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार महेश लांडगे, एमसीसीआयएचे अध्यक्ष दीपक करंदीकर, महासंचालक प्रशांत गिरबाने उपस्थित होते. पुणे ही ज्याप्रमाणे शिक्षणाची पंढरी आहे तसेच उद्योजकांची पंढरीदेखील आहे, असे सांगून सामंत म्हणाले, उद्योजकांच्या मागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या पाहिजेत. यासाठी आपण राज्यातील सर्व एमआयडीसीमध्ये उद्योगांना भेटी देत आहोत, असे त्यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात भेटी देत असताना तळेगाव, चाकण येथे ट्रक टर्मिनल नसल्याचे लक्षात येताच शासनाने तात्काळ ट्रक टर्मिनलला मंजुरी दिली, असेही सामंत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...