आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे कोरोनामुळे निधन

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग(५४, मू. रा. नांदगाव जिल्हा नाशिक) यांचे शनिवारी पहाटे कोरोनामुळे निधन झाले. सर्व माध्यमांशी व पत्रकारांशी अत्यंत सलोख्याचे संबंध असलेले शासकीय अधिकारी अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले (एक अमेरिकेत) असा परिवार आहे. पत्नी आणि एक मुलगा तसेच जिल्हा माहिती अधिकार कार्यालयातील सात कर्मचारी सध्या कोविड पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मनमिळाऊ, सतत दुसऱ्यांच्या मदतीसाठी धावून येणारा माणूस असा सरग यांचा नावलौकिक होता. सरग यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीड, नगर, परभणी, पुणे अशा अनेक ठिकाणी काम केले आहे. राजेंद्र सरग यांना विविध विषयांवर व्यंगचित्र काढण्याचा छंद होता. ते अनेक वर्षांपासून काही दैनिके, साप्ताहिकांना व महाराष्ट्रातील दिवाळी अंकांना मोफत व्यंगचित्र देत असत. त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. सरग यांनी औरंगाबाद येथून पत्रकारितेला सुरुवात केली होती.

१५ दिवसांनंतर बढती मिळणार होती : पंधरा दिवसांत त्यांना बढती मिळणार होती. पण तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. मागील रविवारी त्यांना कोरोना झाल्याचे निदान झाले. त्यातच हाय शुगर डिटेक्ट झाली. शेवटपर्यंत शुगर पातळी खालीच आली नाही. अखेर त्यांचे निधन झाले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतरही सरग यांच्यासारखा अधिकारी गमवावा लागणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

बातम्या आणखी आहेत...