आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाईल ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार:पुण्यातील रिपॉस स्टार्टअपचा अनोखा उपक्रम, चार्जिंग बॅटऱ्यांचा पुर्नवापर करणार

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पुण्यातील रिपॉस स्टार्टअपच्या वतीने दारापर्यंत मोबाईल पेट्रोल पंप या संकल्पनेनंतर मोबाईल ईव्ही चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे जाहीर केले.

देशभरात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणात डिझेलची आवश्यकता असते. मात्र, प्रत्येकवेळी सर्व वाहने पेट्रोल पंपावर घेऊन येणे शक्य नसल्याने बॅरलमध्ये डिझेलची वाहतूक संबंधित ठिकाणापर्यंत करण्यात येते. यामध्ये मोठ्या प्रमाणात डिझेलचा अपव्यय होतो.

ही गरज लक्षात घेऊन पुण्यातील रिपॉस या स्टार्टअपने डिजीटल तंत्रज्ञानाची मदत घेत ‘दारापर्यंत मोबाईल पेट्रोल पंप' सुविधा सुरू केली. या सुविधाला मागील चार ते पाच वर्षात चांगला प्रतिसाद मिळून स्टार्टअपने देशभरात 1 हजार 50 मोबाईल पेट्रोल पंपाच्या माध्यमातून सहा ते सात कोटी लीटर डिझेल वाटपाची डिजीटल सुविधा निर्माण केली आहे.

आता सदर स्टार्टअप मोबाईल ई-व्ही चार्जिंग स्टेशन सुरु करत असून चार्जिंग बॅटऱ्यांचा पुर्नवापर करून प्रत्यक्ष ठिकाणापर्यंत सुविधा पोहचविणार असल्याची माहिती स्टार्टअपच्या संचालिका आदिती भोसले-वाळुंज व संस्थापक चेतन वाळुंज यांनी दिली आहे.

आदिती वाळूंज म्हणाल्या की, देशातील विविध जड वाहतूक व्यवस्था, पायाभूत सोईसुविधा निर्मिती, मोबाईल टॉवर, जनरेटर, औद्योगिक कंपन्या अगदी ठिकाणी पूर्वी पेट्रोल पंपावरून डिझेल वाहतूक बॅरलद्वारे करताना 5 ते 10 टक्के डिझेलचा अपव्यय होऊन नुकसान होत असल्याचे दिसून आले. त्यादृष्टीने आम्ही त्यावर मार्ग काढत मोबाईल पेट्रोल पंपाची सुरूवात करत दारापर्यंत सुरक्षितरित्या डिझेल पोहचविण्याची व्यवस्था निर्माण केली.

केंद्र सरकारने ही त्याची दखल घेत 2019 मध्ये धोरणात बदल करून घरगुती वापर सोडून इतर कामासाठी डिझेल वाहतूकीस परवानगी दिली. देशातील एकूण डिझेल वापरापैकी केवळ 15 टक्के वापर हा कारसाठी होत असून उर्वरित 85 टक्के वापर इतर गोष्टींसाठी होत असल्याने त्याचा फायदा तात्काळ दिसून आला. कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण ही कमी झाले. डिझेलचा वापर कुठे कुठे होतो. किती प्रमाणात होतो. किती पैसे खर्च होतात. किती बचत होते. सुरक्षितता, ने आण करण्याचा वेळेत बचत होईल. आदी बाबींचा एकत्रित डाटा उपलब्ध होऊ लागल्याने त्याचा फायदा संबंधितांना होत आहे.

रस्ते वाहतूकदारांसाठी गाण्याची निर्मिती

रिपॉसतर्फे चाकण येथे बायो डिग्रीडेबल कचरा पुर्नवापर प्रकल्प उभारण्यात येत आहे. ज्याद्वारे वेगवेगळ्या बॅटऱ्यांचा पुर्नवापर करुन त्या पुन्हा चार्जिंग करुन त्याचा वापर करण्यात येईल. दिवसेंदिवस जागेच्या किंमती वाढत असल्याने त्या आर्थिक दृष्ट्या परवडत नसल्याने कंटनेरवरच चार्जिंग स्टेशन उपलब्ध करण्यात येणार असून सोईनुसार त्याचा विविध जागी नेऊन वापर करण्यात येणार आहे. वेगवेगळे क्षेत्र अनेक वेळा समाजसमोर प्रसिद्धी माध्यमातून येतात. मात्र, काही विभागांना कधीतरीच त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान्यता मिळते.

अशाचपैकी एक असलेलेले रस्ते वाहतूक नेटवर्कचा भाग असून देशभर ते प्रवास करत असताना त्यामुळे मिळणाऱ्या सर्व गोष्टी मिळतात. या कामगारांना अभिवादन करण्यासाठी रिपॉसने है हौसला है जुनून हे गाणे स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केले आहे. देशातील स्टार्टअपर्च अशाप्रकारे हे पाहिलेच गाणे तयार करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...