आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात गणेश भक्तांसाठी अहोरात्र वैद्यकीय सेवा:पोलिस आणि विघ्नहर्ता न्यासाचा पुढकार; 347 रुग्णांनी घेतला सेवेचा लाभ

पुणे15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहर पोलिस आणि विघ्नहर्ता न्यासच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश भक्तांसाठी अहोरात्र वैद्यकीय सेवा गणेशोत्सव मिरवणुकी दरम्यान पुरवण्यात आली. या सेवेचा एकूण 347 रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती न्यायाचे डॉ. मिलिंद भोई यांनी सांगितले आहे.

काय म्हणाले डॉ. भोई?

डॉ. भोई म्हणाले, उपचार करण्यात आलेल्या एकूण रुग्णांपैकी 12 जणांना रुग्णालयात अ‍ॅडमिट करावे लागले. एका रुग्णाला हृदयविकाराचा झटका आला होता. परंतु आप्तकालीन वैदकीय उपचार देऊन रुग्णाला अ‍ॅडमिट केल्याने त्याचा जीव वाचवण्यात यश आले आहे. न्यासाच्या माध्यमातून 130 स्वयंसेवकांनी काम केले यात डॉक्टर व नर्स, वॉर्ड बॉय यांचा ही समावेश आहे. अनेक रुग्णांना गर्दीमुळे, उन्हामुळे, अति घाम आल्याने चक्कर येणे, अति आवाजामुळे लहान मुलांचे कान दुखणे, गर्दीत पडल्यामुळे झालेली दुखापती, रक्तदाब वाढल्याने चक्कर येणे, शुगर कमी होणे असे प्रकार दिसून आले आहे.

गरजू रुग्णांसाठी मोफत रुग्णसेवा

श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावर श्री गणेश भक्तासाठी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रथमोपचार व इतर आरोग्य विषयक साहित्य मोफत वाटप करण्यात आले. यासाठी इंडीयन रेड क्रॉस सोसायटी व, इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या युवक विभागातर्फे भारतीय जीवन विमा निगम यांनी सहकार्य केले.गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी पथावर नागरिकांच्या सेवेसाठी मोफत प्रथमोपचार, मोफत पिण्याचे पाणी व इतर सेवा केंद्र चालविण्यात आले .50 हून अधिक नागरिकांना प्रथमोपचार सुविधा देण्यात आली. आरोग्य सेवे बरोबर गणेश भक्तांना पाणी वाटप ही या संस्थेने केले आहे. करोना काळात मोफत रुग्णवाहिकाची सेवा पुणेकरांना दिली होती, गरजूंना मोफत रुग्णवाहिका उपक्रम 'जय हो' या नावाने संस्थेने अजून सुध्दा चालू ठेवला आहे.

रेड क्रॉसतर्फे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत

रेड क्रॉसतर्फे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत बांधण्यात येत आहे, त्यासाठी नागरिकांनी स्वतः हुन निधी दिला. विविध महाविद्यालयातील 75 युवक यात सामील होते.डॉ सविता व मिलिंद पोरे यांनी गणेशोत्सवात दोन दिवस प्रथमोपचार सेवा दिली, त्यांना भारती विद्यापीठच्या विद्यार्थ्यांनी मदत केली. भारतीय जीवन विमा निगम कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक संदीप मोघे व शाखा व्यवस्थापक मुकुंद भाईक यांनी सहकार्य केले. उपक्रमाचे संयोजन युवक रेड क्रॉसचे अध्यक्ष सतीश कांकरिया व उपाध्यक्ष दिपक शहा व क्षेत्रीय अधिकारी श्यामला पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...