आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्ह्यात पोलिसांचा पंच बनणे अंगलट:कोयत्याने तरुणावर हल्ला; संशयितांवर गुन्हा दाखल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका गुन्हयात ओळखीच्या तरुणा विरोधात पोलिसांचा पंच बनून तक्रार दाखल करण्यास मदत केल्याचा आरोप करत 22 वर्षीय तरुणावर पाच जणांच्या सराईत गुन्हेगार टोळक्याने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी कोथरुड पोलिसांनी 5 जणांविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच एका आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली आहे.

काय आहे प्रकरण?

निखील राम शिंदे (वय-22,रा.कोथरूड,पुणे) असे पोलिसांकडे तक्रार दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सागर येनपुरे ऊर्फ मांडी, साहिल जगताप, वैभव जगताप या रेकॉडर्वरील गुन्हेगारांसह साहील कंदारे, पिल्या खेडेकर यांचे विरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरील घटना 4 ऑक्टोबरला मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोथरूड परिसरातील मामासाहेम मोहोळ कॉलेजच्या गेटजवळ घडली आहे. निखील शिंदे व आरोपी हे एकाच परिसरातील रहिवासी आहे.

तरुणावर केला हल्ला

तक्रारदार व त्यांचा मित्र अमोल अवचिते हे रात्री शेकोटी पेटवून गप्पा मारत बसले होते. त्यावेळी सागर येनपुरे या आरोपीने अमोल अवचिते यास सुरज पासुटे कुठे आहे अशी विचारणा करत कानाखाली मारली. तसेच तु माझी माहिती पोलिसांना देतो का तुला आता खल्लासच करतो असे म्हणून हातातील लोखंडी कोयताने उजवे हात्यावर हल्ला करून जखमी केले. त्यावेळी आरोपी साहिल जगताप याने त्यास धरुन ठेवत ‘तु आमच्या विरोधात पंच बनतो काय’असे म्हणून मारहाण केली. तसेच तक्रारदार यांचेवर औषधोपचार करण्यासाठी अमोल अवचिते याचे गाडीवरुन जात असताना आरोपी साहिल कंदारे, वैभव जगताप व पिल्या बेडेकर यांनी गाडीवरुन त्यांचा पाठलाग करत त्यांना रस्त्यावर आडवून तक्रारदार व अवचिते या दोघांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हातात कोयते फिरवून दहशत निर्माण केली.

पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलास बेदम मारहाण

हडपसर परिसरात रामटेकडी येथे राहणाऱ्या 17 वर्षीय मुलगा मित्रा समवेत सिगारेट पित असताना चार जणांचे सराईत गुन्हेगारांचे टोळके त्याठिकाणी येवून त्यांनी जुन्या भांडणाच्या रागातून तरुणावर तलवार, पालघन व दगडांनी मारहाण करुन त्याच्या नाकाला व डोक्याला गंभीर दुखापत केली. त्यानंतर त्याचा एक दात तोडून बेशुध्द करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वानवडी पोलिस पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...