आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Inquiry Order Against BJP State President Chandrakant Patil, Case Of Concealment Of Information While Submitting Election Affidavit

पुणे:भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांविरुद्ध चौकशीचे आदेश, निवडणूक प्रतिज्ञापत्र सादर करताना माहिती लपवल्याचे प्रकरण

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध न्यायालयाने चाैकशीचे आदेश दिले आहेत. पाटील यांनी २०१९ मध्ये कोथरूडमधून विधानसभेची निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यात त्यांनी दोन कंपन्यांचे संचालकपद तसेच राजारामपुरी पोलिस ठाण्यातील गुन्ह्याप्रकरणी न्यायालयात आरोप निश्चित झाल्याची माहिती लपवली होती, असा दावा पुणे न्यायालयात दाखल झाला. याप्रकरणी चौकशी करून १६ सप्टेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी कोथरूड पोलिसांना दिले आहेत.

कोथरूडचे माहिती अधिकार कार्यकर्ता अ‍ॅड. अभिषेक हरिदास यांनी पुणे न्यायालयात याबाबत दावा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, चंद्रकांत पाटील यांनी प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्र अ‍ॅग्रो इंडस्ट्री डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन आणि महाराष्ट्र स्टेट फार्मिंग काॅर्पोरेशन लिमिटेडचे संचालक असल्याची बाब लपवली. तसेच २०१३ मध्ये राजारामपुरी पोलिस ठाण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर भादंवि कलम १४३, १४७, १४९, ४२७, ३३६, ३५३ अन्वये गुन्हा दाखल होता.

बातम्या आणखी आहेत...