आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुणे:आयएनएस शिवाजी येथे नौदलाच्या 12 प्रशिक्षणार्थींना कोरोनाची लागण, 18 जूनला सापडला होता पहिला कोरोनाग्रस्त

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुटीवरून आयएनएस शिवाजी येथे परतलेल्या 157 ट्रेनींपैकी 12 जणांना कोरोना

लोणावळा येथे भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाला ट्रेनिंग देणाऱ्या आयएनस शिवाजी येथील 12 प्रशिक्षणार्थींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बुधवारी यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. लोणावळा येथे 800 एकरावर पसरलेल्या नौदल फॅसिलिटीवर 5000 लोक राहतात. यात 3000 नौदल कर्मचारी, अधिकारी, प्रशिक्षणार्थी आणि इतर स्टाफचा समावेश आहे. तर उर्वरीत 2000 लोकांमध्ये नौदल अधिकारी आणि स्टाफच्या कुटुंबियांचा समावेश आहे.

आयएनएस शिवाजीमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 18 जून रोजी सापडला होता. लॉकडाउननंतर सुटी घेऊ घरी गेलेले आणि परतलेल्या 157 प्रशिक्षणार्थींपैकी तो एक होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, लॉकडाउन उघडल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात अनलॉक 1 ची सुरुवात झाली होती. यातच 157 ट्रेनींच्या बॅचला वाढीव सुटी देण्यात आली होती. ट्रेनिंगला परतल्यानंतर सर्वांना 14 दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आले होते. युनिटमध्येच त्यांची क्वारंटाइनची व्यवस्था करण्यात आली होती. क्वारांटाइन पीरिअडमध्येच एका ट्रेनीला कोरोनाची लक्षणे दिसून आली. चाचणी केली असता 18 जून रोजी त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. 

पहिला रुग्ण पॉझिटिव्ह निघाला तेव्हापासून हाय रिस्क असलेल्या आणि त्या रुग्णासोबत थांबलेल्यांच्या नियमाप्रमाणे चाचण्या घेतल्या जात आहेत. यासाठी सर्वच प्रकारच्या वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात आहेत. आतापर्यंत 157 पैकी 12 ट्रेनी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. कोरोनाचा धोका केवळ क्वारंटाइन केलेल्या ब्लॉक्सपैकी एकाच ब्लॉकमध्ये आहे. तरीही सर्वांसाठी योग्य ती काळजी आणि उपाययोजना केल्या जात आहेत असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...