आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत जोडो:बुद्धिजीवी वर्गसुद्धा भारत जोडोत सहभागी : देशमुख

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या आठ वर्षांमध्ये या देशामध्ये माणासांमाणसांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही जातीयवादी शक्ती करीत आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी याविरोधात भारत जोडो यात्रा करत आहेत. या यात्रेमध्ये सर्वसामान्यांबरोबरच बुद्धिजीवी वर्गही जोडला जात असून देश एकसंघ ठेवण्यासाठी या यात्रेचा उपयोग होत आहे, असे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख म्हटले आहे.

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गुरुवारी खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास माजी मंत्री आ. सतेज पाटील व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली. संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही रॅली फिरून आगाखान पॅलेस येथे तिचा समारोप करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...